Breaking News

उपमुख्यमंत्री अजित दादांची दबंगगिरी अधिकाऱ्यांना म्हणे बैठकीला वेळेवर यायचे

मुंबईः प्रतिनिधी
आपल्या आक्रमक आणि प्रेमळ दमबाजी मुळे प्रसिध्द अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर दैंनदिन कामकाजाला सुरुवात केली. मात्र नियोजित बैठकीला उशीराने उपस्थित राहील्याने एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्र्यांकडून पहिल्याच बैठकीला प्रेमळ दमबाजीचा अनुभव आल्याने दादांच्या दमबाजीची मंत्रालयात चर्चा सुरु झाली.
दिव्यांग विशेषतः कर्णबधीर असलेल्या लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरीकांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण आणि स्टार्की हेअरींग फाँऊडेशनच्या संयुक्तपणे श्रवण यंत्रे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीला या विभागाचे एक उच्च पदस्थ अधिकारीच गैरहजर राहील्याचे लक्षात आले. त्यावेळी अजित पवारांनी संबधित अधिकाऱ्याला बोलावणे धाडले.
अधिकारी येताच उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, मी बोलावलेल्या बैठकीला जी वेळ ठरलेली आहे. त्यावेळेलाच यायचे. जर मुख्यमंत्री साहेबांनी बैठक बोलावली असेल तर ठीक अन्यथा माझ्या बैठकांना वेळेवर यायचे असा प्रेमळ दमही दिला.
दादांच्या या दमबाजीमुळे संबधित अधिकारी जरा गर्भगळीतच झाल्याची माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या अन्य एका अधिकाऱ्याने दिली.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

Check Also

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा…

राज्यातील सर्व समाजघटकांना… अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *