Breaking News

नवाब मलिकांच्या आरोपाला वानखेडेचे प्रतित्युर, मी कारवाई करणार… मी मालदीव मध्ये होतो पण कोणत्याही अभिनेत्याला भेटलो नाही

मुंबई: प्रतिनिधी

मालदीव येथील सहलीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधल्यानंतर समीर वानखेडे यांनी मलिक यांचे आरोप फेटाळून लावत म्हणाले, मी कुटुंबासोबत मालदीवला गेलो होतो. यासाठी मी अधिकृत सुट्टी देखील घेतली होती. याचे पैसे देखील मी स्वत: दिले. तसेच मी बहिणीसोबत मालदीवला गेलो नव्हतो आमची ट्रीप वेगळी होती, याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. तसेच मलिकांनी ट्विट केलेले फोटो मुंबईतील आहेत. मालदिवमध्ये मी कोणत्याही अभिनेत्यांना भेटलो नाही. याचे पुरावे देखील उपलब्ध आहेत. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन मी याबाबत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे प्रत्युत्तर नवाब मलिक यांना दिला.

कोरोना काळात सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मालदीवमध्ये होते, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी करत  त्यासंदर्भातले फोटो देखील आपण देणार असल्याचं असून याप्रकरणात समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे थेट आव्हान नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना दिले.

नवाब मलिकांनी केलेले सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले असून वर्षभरात नोकरी जाईल, या मलिकांच्या इशाऱ्यानंतर समीर वानखेडे यांनी माझ्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. वारंवार १५ दिवसांपासून माझ्या मृत आईवर आणि माझ्या निवृत्त वडिलांवर माझ्या बहिणीवर टीका करण्यात येत आहे. यामध्ये घाण शब्दांचा वापर करण्यात येत आहे. तसेच माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यात येत आहे, या आरोपांचे मी पूर्णपणे खंडण करत असल्याचे ते म्हणाले.

मी एनसीबीत येण्यासाठी २०१९ मध्ये अल्पाय केला होता. तेव्हा ही केस (मलिक यांच्या जावयाची केस) माझ्याकडे नव्हती. त्यामुळे हे आरोप मी फेटाळतो. आम्ही करत असलेल्या कामाला पर्सनली घेत, माझ्या घरच्यांवर आरोप केले जात आहेत. माझी मृत आई, ७७ वर्षाचे वडील यांच्यावर आरोप करणे आपली राष्ट्रीय सेवा आहे का? असा सवाल वानखेडे यांनी नवाब मलिकांना केला.

नवाब मलिक खूप मोठे मंत्री आहेत. लोकांची बदनामी करण्याचा त्यांना अधिकार असेल. पण मी छोटासा सरकारी नोकर आहे. ते खूप मोठे मंत्री आहेत. ते जर देशाची सेवा करण्यासाठी, प्रमाणिकपणे काम करण्यासाठी, ड्रग्ज नष्ट करत असल्यामुळे ते मला जेलमध्ये टाकत असतील तर मी तयार आहे. मी दुबईला गेल्याची मलिकांची माहिती खोटी असल्याचा खुलासा त्यांनी केला.

मी एनसीबीत येण्यासाठी २०१९ मध्ये अल्पाय केला होता. तेव्हा ही केस (मलिक यांच्या जावयाची केस) माझ्याकडे नव्हती. त्यामुळे हे आरोप मी फेटाळतो. आम्ही करत असलेल्या कामाला पर्सनली घेत, माझ्या घरच्यांवर आरोप केले जात आहेत. माझी मृत आई, ७७ वर्षाचे वडील यांच्यावर आरोप करणे आपली राष्ट्रीय सेवा आहे का? असा सवाल वानखेडे यांनी नवाब मलिकांना केला.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *