Breaking News

एनसीबी म्हणते आर्यन खान प्रभावशाली, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला उच्च न्यायालयात दाद मागणार

मुंबईः प्रतिनिधी
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान हा प्रभावशाली असल्याने त्याचा जामिन अर्ज मंजूर करू नका अशी मागणी एनसीबीच्यावतीने विशेष न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. त्यामुळे विशेष दिवाणी न्यायालयाने आर्यन खान याची जामिन अर्ज याचिका फेटाळून लावत असल्याचा निकाल दिला.
आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्याला एनसीबीने किल्ला कोर्टात हजर केले. त्यावेळी त्याला जामिन अर्ज देण्याचा अधिकार विशेष दिवाणी न्यायालयाला असल्याचा युक्तीवाद एनसीबीने करत जामिन अर्जावर निकाल देवू नये अशी विनंती केली. त्यानुसार किल्ला कोर्टाने खान याच्या जामिन अर्जावर निकाल देण्याऐवजी त्यास विशेष दिवाणी न्यायालयात दाद मागण्यास सांगितले.
त्यानुसार आर्यन खान याने विशेष दिवाणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यावर तातडीने निकाल देण्याऐवजी न्यायालयाने २० ऑक्टोंबर रोजी सुणावनी घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार आज विशेष दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांच्यासमोर आर्यन खान याच्या जामिन अर्जावर सुणावनी घेण्यात आली.
न्यायालयात बाजू मांडताना आर्यन खान याच्यावतीने अमित देसाई म्हणाले की, आर्यन खान याच्याकडे कोणत्याही पध्दतीचे अंमली पदार्थ आढळून आले नाहीत की त्याने त्याचे सेवन केल्याचे आढळून आले नाही. ही बाब एनसीबीनेही त्यांच्या तपासणी अहवालात नमूद केली. त्यामुळे खान यास जामिन मंजूर करण्याची मागणी केली.
त्यावर एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी यास विरोध करत म्हणाले की, आर्यन खान याच्यासह तिघांवर हे अवैध अंमली पदार्थ आणि गुन्हेगारी कट कारस्थान आदी गुन्ह्ये एनडीपीएस कायद्याखाली त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यामधून अटकेत असलेल्या १७ संशयितांपेक्षा वेगळे आर्यन खान वागणूक देता येत नाही. तसेच या गुन्ह्याचा तपास असून प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे आर्यन खानला जामिन देवू नये.
त्याचबरोबर एनसीबीकडून अंमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या रॅकेटचा तपास करत असून यात आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट हे त्यात सहभागी असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना जामिन दिल्यास ते बाहेर येवून या प्रकरणातील साक्षिदारांवर प्रभाव टाकू शकतात अशी भीती एनसीबीच्या वकीलांनी व्यक्त केली.
त्यावर अमित देसाई एनसीबीच्या वकीलांच्या युक्तीवादाला विरोध दर्शवित आर्यन खान याच्याकडे कोणत्याही पध्दतीचे अंमली पदार्थ मिळाले नसल्याचे त्याने एनसीबीलाच्या अहवालात नमूद करण्यात आल्याचे त्याने स्पष्ट केले.
कलम २७ ए आणि कलम २९ खाली आर्यन खान याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून ही दोन्ही कलमे गंभीर गुन्ह्याबद्दल लावण्यात येतात. मात्र ही दोन्ही कलमे त्याला अटक केल्यानंतर बदलण्यात आली नाहीत. त्यावर देसाई यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, आर्यन खान याच्यावर अवैध अंमली पदार्थाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संपुर्ण २७ ए चा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच त्याचा उल्लेख ही त्याच्या अटक अहवालातही इतर कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
त्यावर सिंग यांनी खान याच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून यात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचे रॅकेट सहभागी असल्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचा साठा मागविण्याचा अंदाज दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयित आरोपींच्या माध्यमातून कट रचू शकतो या कारणाखाली त्याच्यावर एनडीपीएस कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
तसेच याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या २० पैकी ५ जण हे अंमली पदार्थाची खरेदी-विक्री करणारे आणि एकमेकांशी संबधित असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर अशा त्यांच्या अनेक लिंक असल्याची शक्यता आहे. तसेच आर्यन खान हा प्रभावशाली असल्याने तो साक्षीदार आणि पुराव्यांमध्ये छेडछाड करू शकतो अशी भीती व्यक्त करत त्याला जामिन देवू नये अशी मागणी त्यांनी केली. त्यावर न्यायालयाने आर्यन खानचा जामिन अर्ज फेटाळत असल्याचा निकाला दिला.

Check Also

एनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती भारती सिंह आणि हर्षला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबी अर्थात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *