Breaking News

समीर वानखेडे यांच्याकडील आर्यन खानसह ६ केसेस एनसीबीने काढून घेतल्या दिल्लीची टीम करणार या हायप्रोफाईल केसचा तपास

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

कॉर्डिलिया क्रुज ड्रग्ज केस प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान केस प्रकरणासह ६ केसेसे आज काढून घेत या केसेसचा तपास दिल्लीच्या पथकाकडून करण्यात येणार असल्याची माहिती साऊथ-वेस्टर्न रिजनचे डेप्युटी डिजी मुथा अशोक जैन यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

हा प्रशासकिय निर्णय असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आर्यन खान प्रकरण उघडकीस आल्यानंतर या केसमधील एक पंच असलेला प्रभाकर सैल यांने खळबळजनक गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यासंदर्भात नवनवे खुलासे करण्यास सुरुवात केली. तसेत सैल याने केलेल्या गौप्यस्फोटानंतर आर्यन खान प्रकरणी २५ कोटी रूपयांचा डील करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पुढे आली. याशिवाय डिलमधून ८ कोटी रूपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार असल्याची माहिती पुढे आल्याने यासंपूर्ण प्रकरणासंदर्भातच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

याशिवाय नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुळचे मागासवर्गीय नसल्याचा गौप्यस्फोट करत ते मुळचे मुस्लिम असून त्यांचे पहिले लग्न मुस्लिम पध्दतीनेच झाल्याचे सांगत केवळ नोकरीसाठी त्यांनी मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र मिळविल्याचे उघडकीस आणले. या आरोपापासून बचाव करण्याच्या नादात वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि त्याचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनीही अप्रत्यक्ष अनेक गोष्टीं मान्य केल्या मात्र समीर हे मुस्लिम नसल्याचे सातत्याने सांगत राहीले.

तसेच याप्रकरणातील अनेक साक्षीदार पुढे येत राहिल्याने समीर वानखेडे यांच्यावरील संशयाची ठिपका आणखी गडद होत चालला आहे.

आता एनसीबीनेच्या त्यांच्याकडून आर्यन खान याच्यासह सहा केसेस काढून घेतल्याने समीर वानखेडे हे आणखीनच संशयाच्या भोवऱ्यात अडकत चालले असल्याचे दिसून येत आहे. त्यातच वानखेडे यांची बदली एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयात करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, यासंदर्भात बोलताना समीर वानखेडे म्हणाले की, माझ्याकडून या केसेस काढून घेतल्या नाहीत तर यासंदर्भात आपण न्यायालयात याचिका दाखल करत त्या प्रकरणांचा तपास केंद्रीय पथकाने करावे अशी मागणी केली होती. त्यानुसार आर्यन खान आणि समीर खान या दोन प्रकरणाचा तपास दिल्लीच्या केंद्रीय पथकाकडून करण्यात येणार आहे.

 

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *