Breaking News

एनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती भारती सिंह आणि हर्षला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक

मुंबई : प्रतिनिधी

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबी अर्थात नार्कोटीक्स विभागाला दोन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर सुप्रसिध्द टेलिव्हिजन कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांच्या घरी गांजा आढळून आला. त्यामुळे या दोघांना नार्कोटीक्स विभागाने अटक केली.

शनिवारी सकाळी या पथकाने भारती सिंहच्या घरावर आणि त्यानंतर कार्यालयावर धाड टाकली. यावेळी झालेल्या झाडाझडीत भारतीच्या घरात गांजा आढळला आहे. तो एनसीबीच्या पथकाने जप्त केला. भारती आणि तिचा पती या दोघांनीही गांजा बाळगल्याचं मान्य केले. त्यानंतर आता भारतीला अटक करण्यात आली.

एनसीबीने भारतीच्या ऑफिस आणि घरावर छापा मारला त्यामध्ये त्यांना ८६.५ ग्रॅम गांजा सापडला. हा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर आज सकाळीच भारतीला ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र आता तिला अटक करण्यात आली आहे. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर ही छापेमारी करण्यात आली होती.

यापूर्वी सुशांत सिंह राजपूत याची प्रियसी रिया चक्रवर्ती हिच्या जबानीवरून बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री दिपीका पादूकोन, सारा अली खान हिच्यासह पाच अभिनेत्रींना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी एनसीबीने त्यांचे जबाब घेवून सोडून दिले.

Check Also

गोड गळ्याचे प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांच कोरोनामुळे निधन वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चेन्नई : प्रतिनिधी तेलगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गोड गळ्याचे आणि मुलायम आवाजाचे पार्श्वगायक एस.पी.बालसुब्रम्यन्म …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *