Breaking News

आता मलिकांच्या मुलींनी प्रसिध्द केली वानखेडेच्या पहिल्या लग्नाची पत्रिका आणि दाखला ट्विट करत लग्नपत्रिका आणि साक्षीदारांच्या सहिचे प्रमाण पत्र बाहेर

मुंबई: प्रतिनिधी

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी या आधी अनेक गौप्यस्फोट करत एकच खळबळ उडवून दिलेली असतानाच आता मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाची लग्न पत्रिका आणि त्यावेळी साक्षीदारांनी केलेल्या सह्यांचे प्रमाण पत्रच ट्विटरवरून जाहीर केले. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता बळावली.

या ट्विटमध्ये त्यांनी समीर वानखेडे यांचे २००६ मध्ये शबाना कुरेशी यांच्याशी लग्न झाल्याचा दावा केलाय. सना मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या एका कागदपत्राचा फोटो अपलोड केला आहे. हे समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचे कथित मॅरेज सर्टीफिकेट असल्याचा दावा करण्यात आलाय. तसेच २६ डिसेंबर २००६ रोजी हे सर्टीफिकेट जारी करण्यात आल्याचे यावर नमूद करण्यात आले आहे. सोबतच हे कथित मॅरेज सर्टिफीकेट ट्विटरवर अपलोड करताना सना मलिक यांनी पूर्ण सत्य जनतेसमोर देत आहे, असे कॅप्शन दिले आहे. यापूर्वी समीर वानखेडे यांची लग्नपत्रिका समोर आली होती. या लग्नपत्रिकेमध्ये दाऊद वानखेडे असा उल्लेख केलेला आढळतो. याचाच आधार घेत सना मलिक यांनी पूर्ण सत्य देत असल्याचे म्हणत लग्नाचा दाखला सोशल मीडियावर सार्वजनिक केला.

 

Check Also

एनसीबीच्या एसआयटी पथकाने सुरु केली चौकशी…आर्यनसह सर्वांना समन्स आर्यन खान मात्र आजारी असल्याने चौकशीला आला नाही

मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान प्रकरणावरून जवळपास एक महिन्यापासून रोज नवनवे खुलासे येत असल्याने आर्यन खान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *