Breaking News

मलिकांचा पुन्हा गौप्यस्फोट, “त्या रेस्टॉरंटच्या वस्तू क्रुजवर कशा गेल्या” समीर वानखेडे एक प्रायव्हेट आर्मी चालवून दहशत निर्माण करत होता - नवाब मलिक

गोंदिया: प्रतिनिधी

शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी न घेता समीर वानखेडे याने प्रायव्हेट आर्मी तयार करुन दहशत निर्माण केली होती हे भविष्यात सिध्द करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान क्रुझवर ड्रग्जची रेव्ह पार्टी झाली आणि त्या पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून जे जेवण गेलं त्यातूनच ड्रग्ज गेलं होतं असा गौप्यस्फोट करत यासंदर्भातील सगळे पुरावे समोर आणणार असल्याचा इशारा देत एनसीबीच्या डीजींकडे माझ्याकडे असलेले रितसर पुरावे पाठवणार आहे. इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल त्यांच्या कार्यालयातील आहेत. जागेवर जाऊन मुद्देमाल जप्त केला जात नाही. कार्यालयात आणून हे सर्व केलं जातंय. एका कोर्‍या कागदावर सह्या घेतल्या जात आहेत. समीर वानखेडे याने एक प्रायव्हेट आर्मी तयार केली असून त्यामध्ये प्लेचर पटेल, आदिल उस्मानी, के. पी. गोसावी, मनीष भानुशाली यासारखे अनेक लोक आहेत. हे सर्व घरात घुसून ड्रग्ज ठेवत आहेत आणि लोकांना अडकवत आहेत हे सगळं फर्जीवाडा असून याची संपूर्ण माहिती काढली असल्याचे त्यांनी सांगितले.

कालच फर्निचरवाला नावाच्या मुलीने तिच्या बहिणीला कसं अडकवलं त्यावेळी प्लेचर पटेल उपस्थित होता हे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आणखी मोठा उलगडा होईल असे भाकितही त्यांनी यावेळे केले.

आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही – नवाब मलिक 

सोशल मिडियावर लाल कपडे टाकून नवाब मलिक घाबरतील… आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही असा पलटवार नवाब मलिक यांनी भाजपा पदाधिकारी मोहित कंबोज यांच्यावर केला.

या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहेत. सोशल मिडियावर लाल गाठोड दाखवत आहेत असे चोर लोक माझ्याकडे बोट दाखवत असल्याचा आरोप त्यांनी नाव न घेता केला.

मी भंगारवाला आहे… अशा रद्दी माझ्याकडे दहा – वीस आणि शंभर टन आहेत. आम्ही चोर नाही… आम्ही डाकूकडून सोनं घेतलं नाही… बँका बुडवल्या नाहीत… त्या वानखेडेशी कुणाचा काय संबंध आहे… कुठल्या हॉटेलचे कोण मालक आहे… त्या हॉटेलमधील वस्तू क्रुझवर कशा गेल्या… क्रुझवरील कॅटरिंग मध्ये ड्रग्ज कसे गेले… आता नावं घ्यायला सुरुवात केलेली आहे… इतकं का घाबरताय असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Check Also

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *