Breaking News

नवाब मलिकांकडून क्रांती रेडकरांचे “ते” चॅट उघड ट्विटरवरून पुन्हा नव्या विषयाला तोंड

मुंबईः प्रतिनिधी
समीर वानखेडे आणि वानखेडे कुटुंबियांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना कोणतेही वक्तव्य करण्यापासून मुंबई उच्च न्यायालयाने मनाई करण्यास नकार दिल्यानंतर मलिक यांनी थेट समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांचे एक चॅट उघडकीस आणत आणखी एक खळबळ उडवून दिली.
एका अज्ञात व्हाट्सअॅप किंवा ट्विटर अकाऊंटवरून (कॅप्टन जॅक स्पॅरो) क्रांती रेडकर यांना मेसेज करण्यात आला. त्या मेसेजच्या माध्यमातून नवाब मलिक यांच्याबद्दलची एक खळबळजनक माहिती असल्याचे सांगण्यात आली. त्यावर क्रांती रेडकर यांनी तु ती माहिती दिल्यास बक्षीस मिळेल असे मेसेज करणाऱ्या व्यक्तीला सांगितले. त्यावर सदर मेसेज करणाऱ्या व्यक्तीने रेडकर यांना काँग्रेस नेते तथा माजी खासदार राज बब्बर यांच्यासोबतचा फोटो पाठवून दिला. तो फोटो पाहून क्रांती रेडकर यांनी हा तर राज बब्बर यांचा फोटो असल्याचे उत्तर दिले.
त्यावर मेसेजकर्त्याने राज बब्बर यांच्या पत्नी त्यांना लाडाने दाऊद असे म्हणतात अशी माहिती पुरविली. त्यानंतर रेडकर यांनी त्या अज्ञात व्यक्तीला व्हाट्सअॅप अकाऊंटवर ब्लॉक केले.
सदरचे हे चॅट नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत आणखी एक खळबळ माजविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने अंतरीम आदेश देण्यास नकार मलिक यांच्याकडून ट्विटरच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या आरोपाला खोटे ठरविता येत नसल्याचे सांगत त्याबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नसल्याने मलिक यांना वानखेडे कुटुंबियांच्या विरोधात वक्तव्य करण्यास रोखता येत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मलिक यांनीही कोणताही आरोप किंवा माहिती जाहीर करण्यापूर्वी त्याची पडताळणी करावी अशी सूचनाही केली. त्यामुळे आता मलिक यांनी नव्याने हे चॅट प्रसिध्द केल्याने वानखेडे यांच्यावरील आरोपांच्या यादीत आणखी एकाची नव्याने भर पडली.
क्रांती रेडकर यांच्याबरोबरील चॅट खालील प्रमाणे…
कॅप्टन जॅक स्पॅरो– मॅडम, माझ्याकडे दाऊद आणि नवाब मलिक यांच्यासोबतच्या घनिष्ठ संबधाचा पुरावा आहे.
क्रांती रेडकर- काय पुरावा आहे
कॅप्टन जॅक स्पॅरो-माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा फोटो आहे
क्रांती रेडकर– कृपया पाठवा त्याबद्दल तुम्हाला बक्षिस मिळेल
क्रांती रेडकर– काय हा XXXवेपणा, हे तर राज बब्बर आहेत.
कॅप्टन जॅक स्पॅरो– होय, परंतु राज बब्बर यांच्या पत्नीही त्यांना लाडाने दाऊद म्हणून बोलावते.

Check Also

एनसीबी म्हणते, एसआयटी तपास करणार पण कोणाकडून केसेस काढल्या नाहीत ट्विट करत परिपत्रक जारी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे साऊथ वेस्ट झोनलचे डेप्युटी डिजी मुथा अशोक जैन यांनी आर्यन खान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *