Breaking News

त्या रेव्ह पार्टीचा आयोजक काशिब खानवर कारवाई का नाही? वानखेडे उत्तर द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आणखी एक गौप्यस्फोट

मुंबईः प्रतिनिधी
कॉर्डिलिया क्रुजवरील त्या रेव्ह पार्टीचा आयोजक हा फॅशन टिव्हीचा इंडिया हेड तो दाढीवाला असलेला काशीब खान होता असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत तो आणि त्याच्या गर्लफ्रेंडने या रेव्ह पार्टीचे आयोजन केलेले असताना त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई का झाली नाही? का केवळ तो एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा मित्र असल्याने कारवाई झाली नाही का? या प्रश्नाचे उत्तर वानखेडे यांनी द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
कॉर्डियालावरील पार्टीला फक्त शिपिंग कार्पोरेशनकडून परवानगी घेण्यात आली. राज्याच्या गृहविभाग किंवा पोलिसांकडून परवानगी का घेण्यात आली नाही असा सवाल करत कोणत्या अधिकारात या पार्टीच्या आयोजनास परवानगी देण्यात आल्याचा सवालही त्यांनी यावेळी केला.
पार्टीच्यावेळी क्रुजवर जवळपास १३६० जण उपस्थित होते. ज्या वेळी कारवाई झाली, त्यावेळी या सर्वांचे तपासणी का करण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित करत त्यावेळी हा दाढीवालाही काशीब खान हा ही त्यावेळी असताना त्यालाही का ताब्यात घेण्यात आले नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
केवळ फक्त तीन ते चार लोकांना ट्रॅप करण्यासाठीच या पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे दिसून येत असून त्या तिघांना अडकविण्यासाठीच त्यांना ट्रॅप लावून पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर करत ते म्हणाले की, अख्या त्या पार्टीमध्ये फक्त तीनच जण कसे ड्रग्ज घेताना आढळून येतात असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Check Also

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *