Breaking News

त्या ५ केसेस ट्रान्स्फर करण्याची मागणी का करण्यात येतेय? टॉप - ५ केसेसचा निकष दोन ग्रॅम... चार ग्रॅम... तीन टन की जास्त प्रसिद्धी मिळालेल्या केसेस असणार- नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम
प्रायव्हेट आर्मीच्या माध्यमातून एनसीबीचे झोनल युनिट महाराष्ट्रात खोट्या केसेस करुन खंडणी उकळण्याचा धंदा करत असल्याचे सिध्द झाले असतानाच टॉप – ५ केसेस ट्रान्स्फर करण्याची मागणी होते, हे का करण्यात येतेय याचं उत्तर केंद्र सरकारने द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसार राज्य सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील टॉप – ५ केसेस एनसीबीकडे देण्यात याव्यात असे पत्र महाराष्ट्राच्या डीजींना एनसीबीच्या डीजीने दिले असल्याचे समोर आल्यावर नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर हल्लाबोल केला.
टॉप – ५ केसेसचा निकष दोन ग्रॅम… चार ग्रॅम… तीन टन की जास्त प्रसिद्धी मिळालेल्या केसेस असणार आहे? अशी विचारणाही त्यांनी करत राज्य सरकार आपल्या युनिटच्या माध्यमातून कारवाई करतेय. जेवढं काम एनसीबीला करता येत नाही. त्याच्या कितीतरी पटीने राज्य सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने काम केले आहे. तुमचं युनिट आहे तर काम करा. काम करत नसेल तर एनसीबीचे युनिट बंद करावे असा खोचक सल्लाही मलिक यांनी केंद्रीय गृह खात्याला दिला.
राज्य सरकारचा अधिकार संपवण्याचा प्रयत्न केसेस ट्रान्स्फर करुन केला जातोय की एनसीबीमध्ये खंडणी उकळण्याचा धंदा सुरू होता आणि आता टॉप – ५ केसेसच्या माध्यमातून आणखी खंडणी उकळण्याचा प्रयत्न होतोय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आम्ही आमचं काम करतोय तुम्ही तुमचं काम करा… तुमची संस्था खरंच काम करतेय तर त्या २६ बोगस तयार करण्यात आलेल्या केसेसची चौकशी कधी होणार? निरपराध लोकांना फसवून अटक केली त्यांना कधी सोडणार याचे उत्तर द्या अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, ड्रग्जच्या संदर्भात एनसीबीने पाठविलेल्या पत्र ट्विट करत या पत्रामागील उद्देश आणि हेतू काय असा सवालही उपस्थित करत एनसीबीने याचे उत्तर द्यावे अशी मागणीही मलिक यांनी एनसीबीकडे केली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *