Breaking News

मलिकांचा सवाल, रझा अकादमीच्या कार्यालयात आशिष शेलार काय करत होते? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात हिंसाचार होण्याच्या आधी भाजपाचे आमदार आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसून काय करत होते?, कोणाशी बैठक करत होते ? असा सवाल करत अमरावती येथील हिंसाचारासाठी मुंबईतील आमदाराने पैसे पाठविले असून त्यासाठी तेथील तरूणांना पैसे दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा भाजप दंगलीचे अस्त्र बाहेर काढते. मात्र राज्यातील जनतेला दंगलीचे राजकारण कधीही आवडत नाही. अशा विनाशी राजकारणाचा त्यांनी निषेध करत अमरावती येथे नियोजन पद्धतीने शहरात दंगल भडकवली गेली. याची चौकशी पोलिस करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यात येऊन सांगतात की, महाराष्ट्रातील सरकारला उखडून टाकू. मात्र सरकारे अशी उखडली किंवा बसवली जात नाहीत. केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून धमकावले जाते. बंगालमध्ये हे दिसले. नेत्यांना घाबरवून भाजपमध्ये घेतले गेले. मात्र जेव्हा तृणमूलचे सरकार आले तेव्हा त्याच नेत्यांनी पुन्हा आपल्या पक्षात प्रवेश केला. भाजपला हे समजायला हवे की, तुम्ही पैसे आणि केंद्रीय यंत्रणाच्या माध्यमातून सरकारे उखडू शकत नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्राच्या सरकारचे चुंबक लक्ष्मी नाही असे भाजपला सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा हे महाविकास आघाडी सरकारचे चुंबक असल्याचे सांगत दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्र कधी झुकला नाही ना कधी झुकेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला होता. यामुळे काही ठिकाणी बंद पुकारला गेला. ज्याला हिंसक वळण लागले. काही ठिकाणी दगडफेकही झाली. अशा सर्व लोकांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मालेगावमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये देखील अशीच अप्रिय घटना घडली. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक करण्यात आल्याची चर्चा झाली. मात्र त्यात तथ्य नाही. मुफ्ती ईस्माईल यांनी काही वर्षांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर मुफ्ती ईस्माईल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत निवडून आलेले सर्व नगरसेवक देखील गेले होते. त्यामुळे नगरसेवक हे कागदोपत्री राष्ट्रवादीचे असले तरी ते एमआयएममध्ये गेलेले आहेत असा खुलासाही त्यांनी केला.
कार्डेलिया क्रूझ प्रकरण दाबण्यासाठी आता एनसीबीची गडबड सुरु आहे. या प्रकरणाची तीन ठिकाणी चौकशी सुरु आहे. मुंबई पोलिसांची एसआयटीही चौकशी करत आहे. सत्य परिस्थिती समोर येईलच असे सांगत एनसीबीच्या चांडाळ चौकडीविरोधात हजारो कोटी रुपये खंडणी घेतल्याचा आरोप आहे. याविरुद्ध माझी लढाई आहे. एनसीबीच्या विरोधात नाही असे स्पष्ट करत काशिफ खान याचा नमस्क्रे नावाचा ब्रॅण्ड आहे या ब्रॅण्डचा पेपर एनसीबीने रेडमध्ये ताब्यात घेतले आहेत. काशिफ खान सध्या गोव्यात आहे. रशियन माफीया इथून ड्रग्जचा व्यवसाय करतात. काशिफ खान ब्रॅण्ड पेपर आहे. रेडमध्ये जप्त करण्यात आले आहे. मग वानखेडे का त्याला वाचवत आहे. गोव्यात का रेड होत नाही. महाराष्ट्रातच का? असा सवालही त्यांनी केला.

Check Also

अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसच्या समर्थनार्थ दिल्लीत इंडिया आघाडीची रॅली

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता देशभरात लागू होऊन एक आठवडा आज पूर्ण होत आहे. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *