Breaking News

‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी

जी-७ मध्ये असलेल्या देशांसारखी आरोग्य सेवा आपल्या देशात ‘वन अर्थ वन हेल्थ’ यातून देण्याची संकल्पना पंतप्रधानांनी मांडलीय. परंतु ही सेवा किती दिवसात मिळणार याची वाट पहावी लागेल अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.

शनिवारी जी-७ च्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे निमंत्रित म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.

जी-७ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वन अर्थ वन हेल्थ’ ची संकल्पना मांडली. ही चांगली गोष्ट आहे. परंतु जी-७ मध्ये अमेरीका, जपान, ब्रिटन,ऑस्ट्रेलियासारखे आरोग्यदृष्टया प्रगत देश आहेत. त्यामुळे त्यांच्यासारखी आरोग्यसेवा, त्यांच्यासारखी हॉस्पिटल देशात निर्माण होवोत आणि तशीच सेवा देशवासियांना मिळो अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

 

Check Also

…अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करणार विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात सर्वच जिल्ह्यातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *