Breaking News

नवाब मलिकांचे फडणवीसांना प्रत्युत्तर, मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार सकाळी १० वाजता फोडणार बॉम्ब

मुंबईः प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांची दखल नवाब मलिक यांनी घेत त्यास प्रत्युत्तर देत म्हणाले की, फडणवीस हे फटाका फोडणार होते. परंतु त्यांचा फटाका काही केल्या फुटला पण त्याचा आवाज झाला नाही. परंतु आपण उद्या सकाळी १० वाजता फडणवीस यांनी अंडरवर्ल्डच्या मदतीने मुंबई शहराला कसे वेठीस ठेवले होते याचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे प्रत्युत्तर फडणवीसांन दिले.
भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेवून नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबधित असलेल्या व्यक्तींकडून मालमत्ता खरेी केल्याचा आरोप केला. त्यानंतर तातडीने मलिक यांनी त्यांच्या निवास्थानी आयोजित पत्रकार परिषदेत आरोप केला.
माझ्या ६२ वर्षाच्या जीवनात कधीच कोणी माझ्यावर आरोप केले नाहीत. आता फडणवीसांनी अंडरवर्ल्डचा विषय छेडलाच आहे तर त्यांनी अंडरवर्ल्डच्या साथीने मुंबई शहराला कसे वेठीस धरले होते. त्यांची माणसे अधिकाऱ्यांच्या मदतीने भुखंड कशा पध्दतीने हडप करण्याचा प्रयत्न करत होते याचा सांद्यत माहिती मी उद्या सकाळी देणार असल्याचे सांगत मी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
ज्या गोळवाला कंपाऊडच्या जमिनीच्या खरेदीचा उल्लेख देवेंद्र फडणवीस करत आहेत त्या जमिनीवर सुरुवातीला आम्ही भाडेकरू आहोत. मुनिरा एस. प्लंबर या त्याच्या मालकिण आहेत. आमचे तेथे सुरुवातीला एक गोडावून भाड्याने होते. आज तेथे आमची सहा दुकाने आहेत. प्लंबर यांनी त्या जमिनीच्या विक्रीसाठी पॉवर ऑफ अॅटर्नी ही सलीम पटेल याच्या नावे होती. प्लंबरवाला यांची इच्छा होती की ती जमिन आम्ही खरेदी करावी त्यानुसार ती जमिन आम्ही खरेदी केले. या गोष्टी करताना मी कधीही कोणत्याही गॅगस्टर किंवा गॅगस्टरच्या नातेवाईकांना कधी भेटलो नाही की त्यांना ओळखत नसल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु सरदार शाह वली खान हे त्या ठिकाणी गोळवाला कंपाऊडमध्ये वॉचमन सारखे काम करत होते. तेच भाडेवगैरे वसुल करत होते. नंतर मात्र त्यांनी ३०० चौरस मीटर जागेवर स्वतःच्या कब्जात घेतली. आम्ही ती जमिन खरेदी केल्याने त्यांच्या ताब्यातील जमिन सोडवून घेण्यासाठी जो काही व्यवहार झाला त्याचे पैसे त्यांना दिले आणि ती जमिन आम्ही खरेदी केली. सध्या त्यातील एका जागेवर मदिनातुल को-ऑफ सोसायटी ही इमारत उभी असून त्या इमारतीचे डिम्ड कन्व्हेन्स करायला आम्ही तयार आहोत. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकाच्या कार्यालयात सुणावनीही झाली आहे. मदिनातुल इमारतीच्या मागे झोपडपट्टी आहे. तेथे ३० वर्षाच्या लीजवर आम्ही गोडावून घेतले. तेथे आणिखी चार गोडावून भाड्याने घेतले. आम्ही त्या जागेवरील भाडेकरूचे मालक झाल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
त्याची कागदपत्रेही आहेत. त्या जमिनीची मालकी आम्हीच घ्यावी यासाठी त्याच्या मुळ मालकांनी केली होती. त्यानुसार आम्ही ती घेतली. १४० खोल्या झालेल्या आहेत. त्यातील ६ दुकाने आमची असल्याचे सांगत सरदार शाहवली खान यांच्याकडून खरेदी करताना त्याच्यावर फक्त एका हत्येचा आरोप होता. त्यानंतर तो त्या गुन्हातून बाहेर आला. त्यावेळी हा व्यवहार झाल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीसांना त्यांच्या खबऱ्याने अर्धवट माहिती दिली असून ही माहिती फडणवीसांनी मला मागितली असती तर सगळेच कागदपत्रे मी त्यांना दिली असती. परंतु फडणवीसांनी काही गोष्टी खोटे बोलून त्यासंदर्भातील एक अवडंबर उभे केले आहे. खोटे बोलण्याची सवय आहे तुम्हाला पण जरा ढंगात तरी बोलायचे ना असा उपरोधिक टोलाही त्यांनी लागवला.
ती कागदपत्रे कोणाला चौकशीसाठी द्यायची आहेत त्यांना द्या मी कशालाही घाबरणार नाही. उलट मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत फडणवीस यांना माझी मुलगी नोटीस पाठवत आहे. त्या नोटीशीनंतर ते माफी मागणार नाहीत अशी अपेक्षा आहे आणि लढाई सुरु ठेवतील असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

Check Also

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *