Breaking News

पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात… घाबरणार नाही पण आम्ही उंदीर बाहेर काढू राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई: प्रतिनिधी

अर्धे काय पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात…आम्ही कुणाला घाबरणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी एजन्सीचा वापर केला असता तर अर्धे मंत्रीमंडळ तुरुंगात असते असे वक्तव्य केले होते त्याचा नवाब मलिक यांनी खरपूस समाचार घेत ते पुढे म्हणाले, सत्तेचा गैरवापर करायचा असेल तर तुम्ही कितीही लोकांना तुरुंगात टाकू शकता. परंतु आम्ही घाबरणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना त्यांनी सावधपणे आरोप केले पाहिजे असे सांगतानाच ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान बरेचसे उंदीर आम्ही काही दिवसातच बाहेर काढू असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

केंद्राच्या जुलमी राजवटीच्या विरोधात ही तीन राज्ये वणवा पेटविणार-

इंग्रजांच्या जुलमी अत्याचाराच्या विरोधात लाल-बाल-पाल यांनी क्रांती केली तीच क्रांती भाजपप्रणीत केंद्रसरकारच्या विरोधात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि पंजाब या तीन राज्यातून उभी राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात लाल – बाल-पाल या तीन क्रांतीकारकांचा उल्लेख केला होता. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपचे हे जुलमी सरकार उलथवायला ही तीन राज्ये कारणीभूत ठरणार आहेत असे स्पष्ट केले.

राज्याचे अधिकार जिथे विरोधकांचे सरकार आहे, तिथे केंद्र सरकार यंत्रणेचा वापर करून खोट्या केसेस बनवून बदनाम करत आहे. जे सनदी अधिकारी आहेत ज्यांचा पीएमओमधून कंट्रोल असतो त्या अधिकार्‍यांवर दबाव आणून सरकारला अडचणीत आणण्याचा खेळखंडोबा हा देशभर सुरू आहे. विशेष करुन पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात असल्याचा आरोप त्यांनी केला.

पश्चिम बंगालमधील जनतेने भाजपला दाखवून दिले आहे. तर महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे ती दाखवून देईल. तर पंजाबमधूनही क्रांतीला सुरुवात झालीय. जुलमी केंद्र सरकारच्या विरोधात या तीन राज्यात वणवा पेटणार आहे. या परिवर्तनाच्या लढाईत जनता आमच्यासोबत असेल असेही ते म्हणाले.

Check Also

दिपक केसरकर यांची घोषणा, शाळेत जाणाऱ्या शिक्षकांसाठीही ड्रेस कोड

येत्या शैक्षणिक सत्रापासून राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठीही ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. पुरुष शिक्षकांना शर्ट आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *