Breaking News

वानखेडे, माजी आमदार डॉ.बोंडे आणि… मलिकांकडून एकदम तीन गौप्यस्फोट वानखेडेंचा शाळेचा दाखला, पहिल्या पत्नीच्या भावाला खोट्या केसमध्ये अडकविणे, धमकाविणे

मुंबई: प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर पुढील सुणावनी आज होत आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जातीबाबत स्पष्टता आणणारी कागदपत्रामधील महत्वाचा भाग असलेली शाळेच्या जन्म दाखल्याच्या प्रती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब यांनी आज सकाळीच ट्विटरवरून जाहिर करत समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याची माहिती उघडकीस आणत मोठा गौप्यस्फोट केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या शाळेच्या दाखल्यांमध्ये दोन शाळांचे दाखले असून या दोन्ही शाळांच्या दाखल्यांमध्ये त्यांचा धर्म हा मुस्लिम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच हे दोन्ही दाखले नवाब मलिक यांच्या विरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी १.२५ कोटी रूपयांच्या अवमानकारक याचिकेप्रकरणी न्यायालयात सादर करण्यात आले. याशिवाय अन्य काही महत्वाची कागदपत्रेही न्यायालयात सादर करण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

याशिवाय समीर वानखेडे यांनी त्यांची पहिली पत्नी डॉ.कुरेशी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना धमकावित असल्याचा गंभीर आरोप करत माझ्या आड याल तर तुम्हच्या सर्व कुटुंबियांना ड्रग पेडलर म्हणून तुरुंगात टाकेन अशा धमक्याही दिल्या आहेत. त्याचबरोबर पहिल्या पत्नीच्या कझिन भावाच्या घरात हस्तकामार्फत ड्रग्ज ठेवत त्याच्यावर खोटी केस खाली दाखल केली. सध्या तो तुरुंगात असल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात काही सीसीटीव्ही फुटेज उघडकीस आली असून ती न्यायालयात सादर करण्यात आल्याचे सांगत त्यावर न्यायालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

याबरोबरच शेजारी राहणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याबरोबर वाद झाल्यानंतर त्याच्या मुलाला घरातून बोलावून त्याला खोट्या ड्रग्ज केस मध्ये अडकाविल्याचा आरोप त्या मुलाला अटक करण्यासाठी समीर वानखेडे आणि त्याच्या सोबतचे अधिकारी त्या बिल्डींगच्या आवारात फिरत होते हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत असल्याचा सांगत समीर वानखेडे याची बनावट गिरी आता हुळूहळू उघडकीस येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

याशिवाय अमरावती दंगलप्रकरणी भाजपाचे माजी आमदार डॉ.अनिल बोंडे यांचे फेसबुकवरील एका फोरमवरील भाषणाची ऑडिओ क्लिपही मलिक यांनी ट्विटरवरून उघडकीस आणला असून त्यात अनिल बोंडे हे गुजरात मधील गोध्राकांडानंतर भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये आणि केंद्रातील भाजपाच्या काळात दंगली घडल्यानसल्याचे सांगत सत्तेत असताना भाजपा अशा कोणत्याही गोष्टीत सहभागी होत नसल्याचे सांगत अन्य काही राजकिय घटनांबाबत माहिती देताना त्या ऑडिओमध्ये बोलल्याचे दिसून येत आहे.

  नवाब मलिक यांनी जाहिर केलेली हीच ती कागदपत्रे:

Check Also

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *