Breaking News

माझी मुलगी गुन्हेगार आहे का? वानखेडेने मर्यादीत अधिकारात रहावे नवाब मलिकांचा समीर वानखेडेवर आणखी एक गंभीर आरोप

मुंबईः प्रतिनिधी
समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे माझी कन्या निलोफर मलिक हिचे कॉल डिटेल्स मागितले होते असा खबबळजनक आरोप करत अशी खाजगी माहिती काढण्याचा अधिकार त्याला नाही त्याने मर्यादित अधिकाराने राहिले पाहिजे असा इशारा नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना देत माझी मुलगी गुन्हेगार आहे का? असा सवाल करत कॉल रेकॉर्ड गुन्हेगारांचे मागितले जातात असेही त्यांनी स्पष्ट केले.
समीर वानखेडे याने मुंबई पोलिसांकडे सीडीआरची मागणी केली होती. परंतु मुंबई पोलिसांनी एखाद्याच्या खाजगी जीवनाची माहिती देऊ शकत नाही असे सांगितले. मात्र समीर वानखेडे याने मुंबई आणि ठाण्यातील दोन खाजगी व्यक्ती फोन टॅपिगसाठी ठेवले असून त्या दोन व्यक्तींची नावे आणि पत्ते माझ्याजवळ आहेत. आता ही लढाई खूप लांबवर चालणार असून या गोष्टी येत्या काळात समोर आणणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
समीर वानखेडे यांनी आता नवाब मलिक यांच्या मुलीचे कॉल रेकॉर्ड मागविल्यामुळे वानखेडे हे ही आपल्या अधिकाराच्या बाहेर जावून काम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे समीर वानखेडे याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीची इतकी खाजगी माहिती एखाद्या सरकारी यंत्रणेनेने कारण नसताना मागविणे हे अनाकलनीय असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय वानखेडे हे आपल्या अधिकाराबाहेर जावून काम करत असल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले.

Check Also

दिपक केसरकर यांची घोषणा, शाळेत जाणाऱ्या शिक्षकांसाठीही ड्रेस कोड

येत्या शैक्षणिक सत्रापासून राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठीही ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. पुरुष शिक्षकांना शर्ट आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *