Breaking News

त्या क्रुजवर वानखेडेंचा मित्र आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता: दाढी वाला कोण? नवाब मलिक यांचा आणखी एक गौप्यस्फोट

मुंबई: प्रतिनिधी

कॉर्डीलिया क्रुजवरील रेव्ह पार्टी ही फॅशन टीव्हीने आयोजित केली होती आणि त्या पार्टीला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीया हजर होतो. तसेच त्याच्याबरोबर त्याची प्रेमिकाही घातक शस्त्रासह डान्स करत होती. मात्र ही पार्टी फक्त सिलेक्टेड लोकांना ट्रप करण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत या पार्टीला समीर वानखेडे यांचे मित्र असलेले आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया हाही उपस्थित होता. तो दाढीवाला कोण होता याचे उत्तर समीर वानखेडे यांनी द्यावे अशी मागणी करत त्याच्यावर कारवाई न करता निवडक लोकांना लक्ष्य करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा खबळजनक दावा त्यांनी केला.

आर्यन खान प्रकरणातील एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईतील खोटेपणा उघड करण्यासाठी आणि वानखेडे यांच्या फर्जीवाडासंदर्भात नव्याने माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

त्या क्रुजवर रेव्ह पार्टी झाली असून त्या पार्टीसाठी महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र पोलिसांकडून कोणत्याही स्वरूपाची परवानगी घेण्यात आली नाही. त्यासाठी फक्त शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकाकडून फक्त परवानगी घेवून या पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

मागील वर्षभरात बॉलीवूडमधील ज्या ज्या सेलिब्रिटींना एनसीबीने चौकशीसाठी बोलावले त्यांच्यापैकी कोणावरही अटकेची कारवाई झाली नाही. त्यावेळीही असेच व्हॉट्स चॅटच्या आधारे त्या सर्वांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. याशिवाय या ड्रग्ज माफियांचे गोवा येथे मोठ्या प्रमाणावर रॅकेट चालत असून त्याची माहिती एनसीबीला आहे. यासंदर्भात एनसीबीच्याच अधिकाऱ्याने कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता समीर वानखेडे यांनी ती कारवाई करू दिली नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

त्या पार्टीत जो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता. तो दाढीवाला असून तो समीर वानखेडे यांचा मित्र होता. तो यापूर्वी दिल्लीच्या तिहार तुरुंगात, राजस्थानच्या तुरुंगात असल्याची माहिती पुढे येत आहे. एनसीबी अधिकाऱ्यांची एक टीम मुंबईत आलेली आहे. त्या टीमला मी सार्वजनिकरित्या आवाहन करतो की त्यांनी चौकशी करताना त्या दाढीवाल्याबाबतचीही माहिती घ्यावी. तसेच त्याच्याबद्दल जर माहिती मिळत नसेल तर त्यांनी माझ्याकडे यावे मी त्याचे फोटो, नाव मी त्यांना देईन असेही त्यांनी सांगितले.

तसेच यासंपूर्ण प्रकरणाची इलेक्ट्रॉनिक पध्दतीने तपास करण्यात यावा अशी मागणी त्यांनी एनसीबीकडे करत समीर वानखेडे, प्रभाकर सैल आणि के.पी.गोसावी यांचे सीडीआर तपासावे अशी मागणी करत क्रुजवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जावेत, त्यांनाही जर हे फुटेज मिळाले नाहीत. तर ते आम्ही सर्वासमोर ठेवू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

काहीजण मला विचारत आहेत की, याप्रकरणात मी वानखेडे यांची वैयक्तीक माहिती का बाहेर काढत आहे. त्यांना मी सांगू इच्छितो की मी कोणाच्याही विरोधात नाही. फक्त त्यांनी केलेल्या खोटेपणावर मी बोलत आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत. तरीही त्यांनी मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाण पत्र काढून नोकरी मिळविली. त्यामुळे एका गरजू, ग्रामीण भागात अभ्यास करून मोठ्या पदावर जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका मागासवर्गीय व्यक्तीचा हक्क त्यांनी हिरावून घेतला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

समीर वानखेडे यांच्या जातीचे प्रमाणपत्र आम्ही जात पडताळणी समितीकडे रितसर पाठवून देणार आहे. तेथे त्याबाबत योग्य तो निर्णय होईल असे सांगत यासंदर्भात अनेक दलित संघटना पुढे येत आहेत. त्यांच्याकडून कागदपत्रे मागण्यात येत आहेत. ती सर्व कागदपत्रे त्यांना देत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच यासंदर्भात पुढील अनेक गोष्टी आपण एक एक करून प्रसिध्द करू असा त्यांनी सांगितले.

यावेळी काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ते करत असलेल्या दाव्यांमधील माहिती खोटी निघाली तर काय? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, जर मी दिलेली कागदपत्रे खोटी निघाली तर मी राजकिय संन्यास घेईन आणि मंत्री पद सोडेन असेही ते म्हणाले.

Check Also

तुरुंगातून अरविंद केजरीवाल देत असलेल्या संदेशाची ईडी घेणार गंभीर दखल

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मनी लॉंडरिंग प्रकरणी ईडीने अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *