Breaking News

फडणवीसबरोबरील आयपीएस अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी

भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकार्‍यांसोबत दिल्लीत बैठक घेतल्यानंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केला.

ते सह्याद्री अतिथीगृहात  आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

दिल्ली येथे आयपीएस व मुंबई येथेही काही अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी बैठका घेतल्याचे पुरावे असल्याचे सांगत ईडी व सीबीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मविआच्या मंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे. केंद्र सरकार या एजन्सींचा दुरुपयोग करत आहे. भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर मंत्र्यांच्या विरोधात एक कहानी तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नसल्याने ईडी व सीबीआय या एजन्सींच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. सुप्रीम कोर्टानेही ईडी व सीबीआयच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भाजपचे हे राजकारण जनता बघत असून येत्या काळात जनताच याचं उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यात शिवसेनेनंतर  राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या टार्गेट केले जात असल्याची चर्चा यापूर्वीही सुरू होती. मात्र त्याबाबतची अधिकृत चर्चा होत नव्हती. परंतु राज्यात सत्तातंर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन होवू नये यासाठी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याकडून शिवसेनेच्या समर्थक आमदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. तसेच समाजविघातक कारवाया करण्यात येत असल्याच्या कारणावरून महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेले फोन टॅपिंगप्रकरणाचा अहवाल आणि तो अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केला. याशिवाय मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी तर दिल्लीत भाजपाच्या नेत्याच्या भेटी घेतल्यानंतरच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी वसूली करण्यास सांगितल्याचा आरोप एका पत्राद्वारे करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती.

या पार्श्वभूमीवर आयपीएस अधिकारी आणि सनदी अधिकारी भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा त्यावेळी दबक्या आवाजात सुरु झाली होती. मात्र यासंदर्भात भेटींचे पुरावे असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगत या चर्चेला आता अधिकृत फोडले आहे.

Check Also

सूरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल मतदाना आधीच बिनविरोध

सूरत मधील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचे मुकेश दलाल सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *