Breaking News

समीर वानखेडे आणि कुटंबियांबाबत मलिक यांचा नवा गौप्यस्फोट तर मनसे-जस्मिनचे प्रत्युत्तर मालदीवमधून सर्व वसुली करण्यात आलीय ;समीर वानखेडेच्या परिवारातील सदस्य उपस्थित

मुंबई: प्रतिनिधी

कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

दरम्यान मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते याचे पुरावे मलिक यांनी सादर केले.

समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का याचे उत्तर द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झालीय असा थेट आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकारी जस्मिन वानखेडे यांनी मलिक यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना म्हणाल्या की, ते कोण जज आहे का? त्यांनी प्रश्न विचारल्यावर मी सगळी माहिती द्यायला. मी कोठे गेले कोठे नाही याची माहिती मी माझ्या वडीलांना देईन, माझ्या मित्रांना देईन. तसेच मी कोठे जाणार कुठे नाही याचा निर्णय माझा तो वैयक्तिक आहे. त्यास सार्वजनिक का करू असे प्रतिसावल केला.

यावेळी मनसे नेते अमेय खोपकर यांनी मनसे चित्रपट सेना पूर्णपणे जस्मिन वानखेडे यांच्या पाठिशी असल्याचे सांगत मलिक यांनी खोड काढली असून त्यास नक्कीच उत्तर देवू असा इशारा देत तुमचे जावई ७-८ महिने तुरुंगात असल्याने तुमचा राग समीर वानखेडेवर आहे. त्यात मनसेचे नाव घ्यायचे काय कारण आहे. त्यासंदर्भात तुमच्याकडे पुरावे आहेत का? तुमचे जे काही राजकारण आहे ते तिकडेच खेळा असा इशाराही त्यांनी दिला.

नवाब मलिक यांनी प्रसिध्द केलेले हेच ते फोटो:-

 

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *