Breaking News

या बँका देणार शासकिय अधिकाऱ्यांना वेतन खात्याबरोबर अपघात विम्याचे कवच राज्य सरकारकडे बँकांनी सादर केले प्रस्ताव

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रीयकृत बँकामधील आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच काही बँकामधील गंगाजळी कमी झाल्याचे चर्चा ऐकायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील चार बँकांनी आपल्या बँकातील आर्थिक व्यवहार वाढविण्याच्यादृष्टीने शासकिय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बँकांमध्ये पगाराची खाती उघडल्यास अपघात विम्याचा मोफऱत लाभ देण्याची घोषणा केली. तसेच त्यासंदर्भातचा एक प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविल्याची माहिती पुढे आली आहे.

या पाच बँकानी शासकिय कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आपली वेतन खाती उघडल्यास अपघाती विमा देण्याचे आश्वासन देत अशी घटना घडल्यास कॅशलेस गोल्डर हावर ट्रिटमेंट बँकाकडून सदर खातेधारकास देण्यात येणार आहे. तसेच ही सेवा मोफतमध्ये खातेधारकास मिळणार आहे.

तर एका बॅकेने १ लाखापर्यंतची कॅशलेस गोल्डर हावर ट्रिटमेंट देण्याचे जाहीर केले आहे.अपघातात अपगंत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास दोन लाख रूपयांपर्यतचे विमा संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.

तर एका बँकेने अपघात झाल्यास ५ लाख रूपयांपर्यंतचा अपघात विमा आणि विमान दुर्घटना झाल्यास १० लाख रूपयाचा विमा शासकिय कर्मचारी-अधिकाऱी असलेल्या खातेधारकास देवू केला आहे.

या चार बॅकांनी वेतन खात्याबरोबर अपघात विमा संरक्षण दिले असून सामान्य प्रशासन विभागाकडून यासंदर्भातील माहिती राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना एका पत्राद्वारे कळविली आहे.

यापध्दतीचे प्रस्ताव बॅक ऑफ महाराष्ट्र, बॅक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यासह अन्य दोन बँकांनी राज्य सरकारला सादर केले आहेत.

 

Check Also

अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *