Breaking News

नसीरूद्दीन बॉलीवूडवाल्यांना म्हणाले, सात पिढ्या खातील इतके कमावले तरी… अमेरिकन गायिका रेहान्नाच्या ट्विटवर एकसारखे दिलेल्या उत्तरावर दिली प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आपण या विषयावर का बोलत नाही? असा सवाल अमेरिकन जगद्विख्यात गायिका रेहान्ना हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय कलावंताना विचारला. मात्र अनेक बॉलीवूडमधील नामांकित सेलिब्रटींनी एकसारखे ट्विट करत युनिटी फॉर ऑलचा हॅशटॅग चालविला. त्यावरून ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी बॉलीवूडवासियांना कानटोचणी देत अरे अजून किती तुम्ही कमावाल, तुमच्या सात पिढ्या बसून खातील इतके कमावले. आता काय गमावणार आहात असा उपरोधित सवालही ही बॉलीवूडवाल्यांना केला.

यासंदर्भात नसीरूद्दीन शाह यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या मुलाखतीत त्यांनी वरील कानटोचणी बॉलीवूडवाल्यांना दिली.

 

 

 

Check Also

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटिटि उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार- क्रू सदस्यांना कोवीड-19 च्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *