Breaking News

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून ट्विटरवर ट्रेंड १.१४ मिलियन ट्विटच्या माध्यमातून देशाच्या अर्थकारण, बेरोजगारी, सरकारी कंपन्यांच्या विक्रीवरून प्रश्नांची सरबती

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रीय नेत्यांच्या वाढदिवसाला वर्तमान पत्रे, टेलिव्हिजन यासह सोशल मिडियावर शुभेच्छांचा ट्रेंड आपल्याला नवा नाही. परंतु सलग दोनवेळा देशाच्या पंतप्रधान पदी विरोजमान झालेले नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असताना ट्विटरवर राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून ट्रेंड केला जात असून मोदीजी नोकऱ्या कुठे आहेत? जीडीपी रसातळाला गेलाय,  असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

यातील बहुतांष नेटकऱ्यांनी मागील ६ वर्षात मोदींनी केलेल्या घोषणांचे काय झाले, देशाची प्रगती कुठेय, लोकशाहीचा तवथा खांब कुठे आहे, नोकऱ्यांचे काय झाले, यासाठीच आम्ही मतदान केले होते का? कि देशातील प्रत्येक बेरोजगाराने आत्महत्या केली पाहिजे असा सवाल विचारला आहे. तसेच एका नेटकऱ्याने तर हॅपी जुमला डे अशी उपरोधिक टिपण्णी मोदींना टॅग करून केली आहे.

तर एकाने मोदी हे देशातील तरूणांना आणि शेतकऱ्यांना विसरत असल्याचे लिहित मोदीजी असे का करताय असा सवाल त्याने केलाय. तर देशात ६३ टक्के पदवीधारक आहेत, कुठे आहेत २ कोटी नोकऱ्या असा दुसरा एका नेटकऱ्यांने सवाल केलाय. तर काही जणांनी मोदीचा वाढदिवस अशा पध्दतीने ट्रेंड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.  यातील काही निवडक ट्विट आम्ही देत आहोत.

 

 

 

 

 

 

Check Also

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय: परिक्षा नाही- मुलांना पुढच्या वर्गात प्रवेश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी दिवसेंदिवस राज्यातील कोविड बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आता लहान मुलांनाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *