Breaking News

राणेंकडे एमएसएमई तर गडकरीकडील एक खाते काढले डॉ.कराड नवे अर्थ राज्यमंत्री, पाटील पंचायत राज्यमंत्री, तर पवार आरोग्य राज्यमंत्री

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश करण्यात आला. नारायण राणे यांच्याकडे मायक्रो-स्मॉल अॅण्ड मिडियम एंटरप्रायझेस अर्थात एमएसएमई या खात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर गडकरी यांच्याकडील रस्ते महामार्ग वगळता शिपींग कार्पोरेशन, पोर्ट आणि आयुष मंत्रालयाची जबाबदारी सरबानंद सोनोवाल यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याशिवाय डॉ.भागवत कराड यांच्याकडे अर्थ राज्यमंत्री म्हणून, कपिल पाटील यांना पंचायत राज्यमंत्री आणि डॉ.भारती पवार यांच्याकडे आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री पदभार सोपविण्यात आला.

नव्याने समावेश झालेल्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये ज्योतीरादित्य सिंदिया यांच्याकडे सिव्हील एव्हिएशन अर्थात विमान वाहतूक हे खात्याची जबाबदारी, धर्मेद्र प्रधान यांच्याकडील पेट्रोलियम खाते काढून ते बढती देण्यात आलेल्या हरदीप सिंग पुरी यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यांच्याकडे गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. तर प्रधान यांना रमेख पोखरीयाल निशंक यांच्याकडील मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा पदभार सोपविण्यात आला आहे. मुक्तार अब्बास नक्वी यांच्याकडील अल्पसंख्याक मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे.  विरेंद्र कुमार सिंह यांच्या सामाजिक न्याय मंत्रालयाचा कारभार, अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे आणि आयटी खात्याचा कारभार सोपविण्यात आला आहे. यापूर्वी हा भर पियुष गोयल यांच्याकडे होता. गोयल यांच्या सध्या वाणिज्य, उद्योग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक, टेक्साटाईल मंत्रालयाचा पदभार सोपविण्यात आला आहे.  भुपेंद्र यादव यांच्याकडे श्रम (कामगार) मंत्रालय सोपविण्यात आले.

पशुपती कुमार पारस यांच्याकडे अन्न प्रक्रिया मंत्रालय, रवी शंकर प्रसाद यांच्याकडील कायदा मंत्रालयाची जबाबदारी किरण रिजुजी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. आरोग्य विभागाची जबाबदारी डॉ.मनसुख मांडविया यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पुरोषत्तम रूपाला यांच्याकडे मत्स व पदुम मंत्रालयाची जबाबदारी, अनुराग ठाकूर यांच्याकडे माहिती व प्रसारण आणि युवक व क्रिडा अशा दोन खात्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे.

जी.किशन रेड्डी यांच्याकडे सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य राज्यांच्या मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. तर इंद्रजीतसिंह राव, डॉ.जितेंद्र सिह यांच्याकडे स्वतंत्र पदभार सोपविण्यात आला आहे.

याशिवाय फग्गनसिंह कुलस्थे, प्रल्हाद सिंग पटेल, अनुप्रिया पटेल, राजीव चंद्रशेखर, शोभा कर्देळज्जे, भानु प्रताप सिंह वर्मा, दर्शना विक्रम जरदोष, एल.मुरगन, मिनाक्षी लेखी, एन. नारायणस्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट, देवूसिंह चौहान, भगवंत खुबा, प्रतिमा भौमिक, डॉ.सुभाष सरकार, राजकुमार रंजन सिंह यांच्यासह बाकीच्यांना राज्यमंत्री म्हणून विविध मंत्रालयाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *