Breaking News

स्वा. सावरकरांचा विषय रेकॉर्डवर नको म्हणताच भाजपाचा गोंधळ विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी घेतली हरकत

नागपूरः प्रतिनिधी
विधानसभेत कलम २३ आणि ५७ अन्वये कामकाज बाजूला ठेवत स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत चर्चेस सुरुवात केली. मात्र अध्यक्ष नाना पटोले यांनी हे रेकॉर्डवर घ्यायचे नाही असे सांगताच भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळाच सभागृहाचे कामकाज सुरुवातीला १० मिनिटासाठी तहकूब केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी शरद बोबडे यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपले मत मांडत लगेच स्वा.सावरकर यांच्या विषयीचा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. यावेळी भाजपाचे सदस्य मी सावरकर लिहिलेल्या गांधी टोप्या घालून सभागृहात आले होते.
मात्र विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी हे रेकॉर्डवर घ्यायचे नाही अशी भूमिका मांडली. त्यावर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सावरकर हे काय असंसदीय आहेत का? ते महाराष्ट्रातील महापुरूष होते त्यांच्यावर चर्चा का नको विचारणा केली. त्यावर भाजपचे इतर सदस्यही अध्यक्षांच्या आसनाकडील जागेकडे गोंधळ करत धाव घेण्यास सुरुवात केली. या गोंधळातच विधान सभाध्यक्ष पटोले यांनी सभागृहाचे कामकाज सुरुवातीला १० मिनिटासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केले.

Check Also

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *