Breaking News

भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी

सत्तेचा कितीही दुरुपयोग करा, परंतु भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही नसल्याचे सांगत भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री व नेत्यांना दिलेल्या धमक्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले.

भाजपला जे करायचे आहे ते करावे. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. नकली केसमध्ये अडकवा किंवा जेलमध्ये ठेवा आणि सत्तेचा दुरुपयोगही करा ही काय नवीन गोष्ट नसल्याचे ते म्हणाले.

नारायण राणे प्रकरणावरून परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या काही नेत्यांना भाजपाकडून टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही वक्तव्य केल्याप्रकरणी तीन वर्षानंतर भाजपाकडून महाराष्ट्रापासून ते उत्तर प्रदेश पर्यत भाजपाकडून तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. भाजपाच्या या सूडाच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी ही टीका केली.

अफगाणिस्तान विषयावर सर्वपक्षीय एकजूट राहिली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका – मलिक 

अफगाणिस्तान विषयावर सर्व पक्षीय एकजूट राहिली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. आज दिल्ली मध्ये अफगाणिस्तान विषयावर सर्व पक्षीय बैठक ११ वाजता होत असून आदरणीय खासदार शरद पवार हे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आजपर्यंतच्या घडामोडीबाबतची माहिती या बैठकीत दिली जाईल आणि पुढे काय करायचे याची चर्चा होईल असेही त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर भारताने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. मात्र या विषयावर देशातील सर्वपक्षियांचे मत जाणून घेण्याकरीता केंद्र सरकारने आज बैठक बोलावली आहे. त्यापार्श्वभूमीवर मलिक यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.

Check Also

…ओबीसी व खुल्या वर्गावरचा अन्याय दुसरीकडे भरून काढणार राज्य सरकारचा निर्णय घेतल्याची अजित पवारांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या आदिवासीबहुल जिल्हयात ओबीसी जागांवर परिणाम होतोच आहे. शिवाय इतर खुल्या वर्गावरदेखील अन्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *