Breaking News

UPSC च्या परिक्षार्थींसाठी राज्य सरकारकडून असा ही मदतीचा हात दिल्लीत मुलाखतीसाठी येणाऱ्यांना ७ दिवस मोफत राहण्याची सोय

मुंबई : प्रतिनिधी

UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देवून सनदी अधिकारी बनण्याकडे सध्या राज्यातील तरूणांचा कल वाढ आहे. मात्र लेखी परिक्षेत पास झाल्यानंतर मुलाखसाठी नवी दिल्लीला जावे लागते. तेव्हा राज्यातील परिक्षार्थी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वणवण भटकावे लागते, तसेच खाजगी ठिकाणी जास्तीचे पैसे द्यावे लागत असल्याने लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत आणि वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ७ दिवस नवी दिल्लीतील नव्या आणि जून्या महाराष्ट्र सदनात मोफत राहू देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पहिल्या लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने लेखी परिक्षा झाल्यानंतर मुलाखतीसाठी नवी दिल्ली येथे पाचारण केले. परंतु अनेक विद्यार्थ्यांना राहण्याची अडचण उभी राहीली. तसेच अनेकांना मुलाखती आणि वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्यांना राहण्यासाठी जास्तीचे पैसे मोजून खाजगी लॉजवर रहावे लागले. त्यामुळे मुलाखत, तपासणीचे असलेले ठिकाण आणि राहण्याचे ठिकाण यामध्ये जाण्या-येण्यातही बराच वेळ खर्ची पडला.

यापार्श्वभूमीवर लोकसेवा आयोगाच्या मुलाखत आणि वैद्यकिय तपासणीसाठी आलेल्या परिक्षार्थींना ७ दिवस मोफत राहण्याची सोय नवी दिल्लीतील नव्या आणि जून्या महाराष्ट्र सदनात मोफत राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार आता आयोगाच्या मुलाखती आणि वैद्यकीय तपासणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सहजरित्या राहण्याची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच त्यांच्या पैसा आणि वेळेतही बचत होणार आहे.

राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच या परिक्षार्थींची गैरसोय होणे टळणार आहे. याशिवाय या परिक्षार्थींचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *