Breaking News

राज्यातील जनतेला मिळणार मॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, जॉन्सन अँड जॉन्सन लस? परदेशी लसींच्या खरेदीच्या अनुषंगाने चाचपणी

मुंबई : विशेष प्रतिनिधी

१ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यातील १८ ते ४४ वर्षावरील नागरीकांचे मोफत लसीकरण सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जरी घेण्यात आलेला असला तरी त्यासाठी लागणारा लसींचा पुरवठा सध्या तरी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टीट्युटकडून उपलब्ध होणे शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी अमेरिकन मॉर्डना,  फायझर, जॉन्सन अॅड जॉन्सन, रशियाची स्पुतनिक आदी लस उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.

केंद्र सरकारकडून फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्यासह ४५ ते ८० वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासाठी सध्या विविध राज्यांना लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच कोमॉर्बिडीटी असलेल्या व्यक्तींसाठीही लसीकरण मोहिम राबविली जात आहे. या गटातील व्यक्तींचेच अद्याप लसीकरण पूर्ण झालेली नाही. त्यामुळे इतर वयोगटातील व्यक्तींसाठी सध्या तरी लस उपलब्ध होताना दिसत नाही. महाराष्ट्राला सध्या १ लाख लसींचा पुरवठा होत असला तरी केंद्राने निर्धारीत केलेल्या वयोगटातील व्यक्तींचे पूर्णत: लसीकरण झालेली नाही. यापार्श्वभूमीवर आता १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लस उपलब्ध होईल का नाही याबाबत साशंकता असल्याचे त्यांनी सांगितले.

यापार्श्वभूमीवर राज्यातील सरकारने निर्धारीत केलेल्या वयोगटातील व्यक्तींसाठी परदेशी लस उपलब्ध करण्यासंदर्भात चाचपणी करण्यात येत आहे. तर सीरम इस्टीट्युट आणि भारत बायोटेक यांच्याशी लसींचा साठा उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात १ मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळाली तर लसीकरण करता येईल, असं सांगतानाच लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुषंगाने प्रत्येकाला लस मिळेल. तसेच येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे.

Check Also

नीती आयोगाच्या माजी सल्लागाराकडून पंतप्रधान मोदींवर टीकेचा भडीभार आर्थिक निती आणि कोविड परिस्थितीवरून डॉ.अरिंदम चौधरीचा हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी देशाच्या नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोगाची स्थापना केल्यानंतर आर्थिक आणि इतर क्षेत्रातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *