Breaking News

आक्रमक महाविकास आघाडीने एफडीए आयुक्त काळेंची केली बदली राज्य सरकारकडून तडकाफडकी निर्णय

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात रेमडेसिवीर औषधांच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेषत: एफडीएच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र ब्रुक फार्माच्या कथित औषध साठ्यावरून भाजपा विरूध्द महाविकास आघाडी असा सामना रंगलेला असतानाच महाविकास आघाडी सरकारने थेट एफडीएचे आयुक्त अभिमन्यु काळे यांची तडकाफडकी बदली करत सेल्स टॅक्सचे आयुक्त परिमल सिंग यांना त्या पदावर नियुक्त केले.

वास्तविक पाहता राज्यातील रेमडेसिवीर औषधे तातडीने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने भाजपा नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या मध्यस्थीमधून उपलब्ध करून देण्यात येणार होते. या औषधे तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी ब्रुक फार्मा कंपनीने पुरवठ्यासाठी परवानगी एफडीएकडे मागण्या आधीच रेमडेसिवीरच्या पुरवठा आणि विक्री करण्याविषयीची परवानगी ब्रुक फार्माला देवून टाकली. तरीही ब्रुक फार्माने गुजरात राज्याच्या एफडीएकडून परवानगी मिळत नसल्याचे स्पष्ट केले.

त्यातच मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीचे संचालक कोनडिया यांना चौकशीसाठी बोलावले. हे वृत्त कळताच भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, पराग आळवणी आदी बीकेसीतील पोलिस स्टेशनला गेले. त्यानंतर याप्रकरणावरून राज्यातील भाजपा नेते आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये कलगीतुऱ्याचे राजकारण रंगले. अखेर याप्रश्नी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी बोलत ब्रुक फार्माकडून मिळणारे इजेक्शन अखेर राज्य सरकारलाच मिळणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेते राजकियदृष्ट्या अडचणीत आले.

यापार्श्वभूमीवर अखेर एफडीएचे आयुक्त अभिमन्यु काळे यांची तडकाफडकी बदली करत त्यांच्या जागी सेल्स टॅक्सचे परिमल सिंग यांच्याकडे सोपविण्यात आला.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *