Breaking News

या १४ आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील १४ सनदी अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या असून कोशल्य विकासचे आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह यांची वर्णी उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या सहसचिव पदी लावण्यात आली आहे. तर एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी मलीकनेर यांची मात्र आहे त्याच पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
तर कामगार विभाग आयुक्त कल्याण यांच्या ठिकाणी सुरेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यशदाच्या उपमहासंचालक पदी पुणे महापालिकेचे उपायुक्त प्रताप जाधव यांची करण्यात आली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची प्रदेश नियंत्रण प्राधिकरण या पदावर करण्यात आली आहे.
बदल्या झालेल्या सनदी अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांची नियुक्ती पदे खालीलप्रमाणे…
०१. संजय दैने, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, मालेगाव महानगरपालिका.
०२. अनिल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांची नियुक्ती सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई या पदावर.
०३. मलीकनेर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी.
०४. सुरेश जाधव यांची नियुक्ती आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर.
०५. प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे या पदी.
०६. कुमार खैरे यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर.
०७. जी एम बोडके सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका या पदावर.
०८. एस जी देशमुख, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर.
०९. एम देवेंद्र सिंह यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या पदावर.
१०. राहुल कर्डिले, यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.
११. जी एस पापळकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर.
१२. रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर.
१३. एन आर गटणे, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या पदावर.
१४. दीपेंद्रसिंह कुशवाह, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई यांची नियुक्ती सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर.

Check Also

लोकल प्रवासासाठी लसप्रमाणपत्राची पडताळणी करायचीय, मग या सोप्या गोष्टी करा मुंबई महापालिकेने कडून १०९ स्थानकांवर केली ऑफलाईन तपासणी सुविधा

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *