Breaking News

कोविड काळातील सेवेसाठी राज्य सरकारकडून डॉक्टरांना अशीही “भेट” सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात कोविड काळात मृत्यूशी सामना करत रूग्णांना वाचविण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत अनेक डॉक्टरांनी आपल्या सेवेचे मौल्यवान योगदान दिले. या योगदानाबद्दल राज्य सरकारकडून सर्व शासकिय आणि पालिका रूग्णालयाच्या निवासी डॉक्टरांना राज्य सरकारने एक अनोखी भेट दिली. या कामाचा ऋणनिर्देश म्हणून १ लाख २१ हजार रूपये भेट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासंदर्भात शासन निर्णयही आज जारी करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटने समवेत बैठक घेऊन त्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यारमाने दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला.

या निर्णयाप्रमाणे शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकाला १ लाख २१ हजार रुपये देण्यात येतील.

तातडीने हा शासन निर्णय काढल्याबद्धल सेंट्रल मार्डतर्फे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *