Breaking News

सरत्या वर्षात म्युच्युअल फंडांनी केले मालामाल ८३ टक्क्यांपर्यंत मिळाला परतावा

मुंबईः नवनाथ भोसले

म्युच्युअल फंड उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी २०१७ वर्ष खूपच चांगले गेले अाहे. काही फंडांनी तब्बल ५० टक्क्यांपेक्षाही अधिक परतावा दिला आहे. चांगला परतावा मिळाल्यामुळे संपूर्ण वर्षभर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली. नोव्हेंबर २०१७ पर्यंत म्युच्युअल फंडाची संपत्ती वाढून २२.७३ लाख कोटी रुपयांवर गेली. तर नवीन खात्यांची संख्या ६.४९ कोटी (फोलियो) झाली आहे. यामध्ये इक्विटी, टॅक्स सेविंग आणि बॅलन्स्ड फंडांच्या नवी खात्यांची संख्या वाढून ५.३० कोटींवर गेली आहे. आगामी काळातही म्युच्युअल फंडांकडून चांगला परतावा मिळेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

एका वर्षात म्युच्युअल फंडांच्या प्रत्येक श्रेणीतील टॉप ३ स्कीममध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. यामध्ये सर्वाधिक ८३ टक्के परतावा मिळाला आहे. तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा डझनभर फंडांनी दिला आहे.

प्रत्येक श्रेणीतील ३ टॉप फंड

 स्मॉल अँड मिड कॅप फंड                                  परतावा (रिटर्न)

1) एसबीआय स्‍मॉल अँड मिड कॅप Direct (G)                 ८३.१ %

2) एल अँड टी इमर्जिंग बिझनेस फंड DP (G)                  ६९.६ %

3) आयडीएफसी स्‍टर्लिंग इक्विटी Direct (G)                   ६६.० %

 

लार्ज कॅप फंड

1) आयडीएफसी इक्विटी Direct (G)                            ६१.०५ %

2) जेएम कोर 11 फंड Direct (G)                                ५०.६ %

3) डीएचएफएल लार्ज कॅप -Sr 1-DP (G)                     ४७.२ %

बॅलन्स्ड फंड

1) प्रिन्सिपल बॅलन्स्ड – Direct (G)                                 ४०.२ %

2) बड़ोदा पॉयनियर बॅलन्स्ड  – Direct                            ३३.९ %

3) रिलायन्स आएसएफ बॅलन्स्ड -Direct (G)                  ३३.५ %

 

 डायवर्सीफाइड इक्विटी

1) एचडीएफसी स्‍मॉल कॅप फंड Direct (G)                    ६४.७ %

2) सुंदरम वॅल्‍यू फंड Sr I – Direct (G)                          ६२.३ %

3) रिलायन्स कॅपिटल बिल्‍डर -II-Sr-B DP(G)                ५७.९ %

 

नवीन वर्षात गुंतवणूकीचा घ्या आढावा

जर म्युच्युअल फंडामध्ये अगोदरच गुंतवणूक केली असेल तर नवीन वर्षात फंडांचे पुनरावलोकन करणे अावश्यक आहे. जर तुमचा म्युच्युअल फंड परताव्याच्या बाबतीत टॉप ३ किंवा ५ मध्ये नसेल तर नवीन फंडामध्ये गुंतवणूक वळवण्याबाबत विचार करावा. गुंतवणूकदारांना दर दोन ते तीन महिन्यांमध्ये एकदा परतावा बघून आपल्या गुंतवणूकीचे पुर्नवलोकन करण्याची गरज आहे. यामुळे गुंतवणूकीचा परतावा वाढण्यास मदत होईल. गुंतवणूकदारांनी आपल्या फंडांच्या श्रेणीतील टॉप ५ फंडांवर नजर ठेवली पाहिजे. जर तुमचा फंड यामध्ये नसेल तर गुंतवणूक वळवण्याचा विचार करणे गरजेचे आहे.

Check Also

ओला कॅबचा आयपीओ लवकरच बाजारात ५०० लाखाचा निधी उभारण्यासाठी महिनाभरात आणणार

SoftBank अर्थसहाय्याने प्रणित ओला कॅब Ola Cabs पुढील तीन महिन्यांत $५०० दशलक्ष उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *