Breaking News

गुजर यांच्या घोषणेनंतर मंत्री परिवहन मंत्री परब म्हणाले… गुन्हे दाखल झालेल्यांवर कारवाई पूर्ण झाल्यानंतरच गुन्हे मागे घेवू

मराठी ई-बातम्या टीम

एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे अजय गुजर यांच्याबरोबरील चर्चेनंतर गुजर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यांच्यावरील कारवाई कामगार कामावर आल्यानंतर मागे घ्यावी. त्यावर कामगार कामावर आले आणि डेपो चालू झाले तर आम्ही कारवाई मागे घेऊ, अशी घोषणा करत त्यांनी सांगितले की, फक्त ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यावर कारदेशीर कारवाई पूर्ण करुनच मागे घेऊ असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

विलिनीकरणाचा मुद्दा त्रिसदस्यीय समिती जो अहवाल देईल तो आम्हा दोघांनाही मान्य असेल असे परब यांनी पुन्हा सांगत त्यांनी आमच्याकडे मागण्या केल्या होत्या. त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला पगार मिळावा ही त्यांची मागणी होती. आम्ही जी मूळ पगारात वाढ करत त्यांना चांगल्या स्थानी नेऊन ठेवले आहे, तसेच संपाचा आज ५४ वा दिवस आहे, हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. न्यायालयाने संप करू नये, कामावर हजर व्हा असे बजावले होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर वेळेवर पगार मिळाला. १० तारखेच्या आत पगार व्हावा ती मागणी आम्ही आधीच मान्य केली आहे. यासोबत त्यांच्या ज्या आर्थिक मागण्या होत्या त्यावर चर्चा करण्याची मागणी आम्ही मान्य केली. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांची प्रकरणं आम्ही तपासू, त्यांच्या कुटुंबियांना नोकरी मिळावी हा मुद्दा आम्ही महामंडळासमोर ठेवू आणि तो मान्य करु, असेही त्यांनी सांगितले.

मात्र अजय गुजर जरी बैठकीला हजर असले तरी काही संघटना आणि एसटी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला आहे, त्यामुळे संपात सध्या फूट पडल्याचेही दिसून येत आहे.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *