Breaking News

उच्च न्यायालयाने दिला आदेश कॉ. पानसरे प्रकरणाचा तपास एटीएसकडे पानसरे कुटुंबियांनी केली होती याचिका

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी कडून केला जात आहे मात्र तपासातून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हा तपास महाराष्ट्र एटीएस कडे सोपविण्यात यावा अशी पानसरे यांच्या कुटुंबियांनी मागणी केली होती. त्यानुसार आज उच्च न्यायालयाने तसे निर्देश दिले.

महाराष्ट्र एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मात्र पानसरे कुटुंबीय त्याबाबत समाधानी नाहीत. तसंच तपास एटीएसकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. या मागणीवर राज्य सरकारला काही तरी निर्णय घ्यावाच लागेल, असे सरकारला सुनावले होते. त्याचबरोबर पानसरे कुटुंबीयांच्या मागणीवरील निर्णयाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.

पानसरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कन्नड अभ्यासक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासात एटीएसनेच धागेदोरे शोधले होते. एटीएसने २०२० मध्ये औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणात काहीजणांना अटक केली होती. त्यातून या चारही हत्यांचे सूत्रधार सारखेच असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच फरारी आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनीच पानसरे यांच्यावर गोळीबार केल्याचे त्यातील आरोपींच्या चौकशीत उघड झाले होते, असे पानसरे कुटुंबीयांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

Check Also

शिवभक्ताचा ५०० वेळा पायी रायगड दर्शन, राजू देसाई यांचा सन्मान

शिवचरित्राचे गाढे अभ्यासक, प्रखर शिवभक्त राजेश उर्फ राजू देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘अपरिचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *