Breaking News

मुंबईवरील हल्ल्याच्या इशाऱ्यावर पोलिस आयुक्तांची माहिती, त्यानंतर एकास अटक तो नंबर पाकिस्तानातील

पाकिस्तानचा कोड असलेल्या एका व्हॉट्सअॅप नंबरवरून मुंबईवर २६/११ च्या धर्तीवर हल्ले करण्यात येणार असल्याचा संदेश मुंबई ट्राफिक पोलिसांना आले. त्यामुळे तातडीने मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकार परिषद घेत, आम्ही काळजी घेतली असून लवकरच याची चौकशी करणार असल्याचे सांगितले. मात्र ही पत्रकार परिषद संपत नाही तोच मुंबई पोलिसांनी तातडीने आपली यंत्रणा सक्रिय करत विरार येथून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. तसेच या व्यक्तीची एटीएस आणि मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु करण्यात आली. सदर अटक करण्यात आलेला व्यक्ती हा उत्तर प्रदेशातील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई ट्राफिक पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर अनेक धमकीचे मजकूर प्राप्त झाले. आलेल्या मेसेजमध्ये मुंबई शहर उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबईला २६/११ प्रमाणे हल्ले करून उडवून देण्याचा इशाराही देण्यात आला होता. या धमकीचे संदेश पाकिस्तानचा कोड असलेल्या एका नंबरवरून आले होते. त्यामुळे हे सगळे संदेश गांभीर्याने घेतले असून पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे. धमकीच्या संदेशाची चौकशी करण्यासाठी योग्य ते आदेश देण्यात आले आहेत. तसेच किनारपट्टी असलेल्या भागात सुरक्षा सतर्क करण्यात येत असून भारतीय तटरक्षक दलाशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंजाबमधल्या स्फोटप्रकरणी महाराष्ट्र एटीएस आणि पंजाब पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत एकास शिर्डी येथून अटक करण्यात आली आहे. तसेच पंजाब पोलिसांनी याप्रकरणात आणखी दोघांना अटक केली आहे.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *