Breaking News

राष्ट्रवादीचा आरोप, शिंदे गटाच्या मेळाव्याकरिता शासकीय यंत्रणांचा नियमबाह्य वापर तात्काळ निलंबन करण्याची केली मागणी- अ‍ॅड. अमोल मातेले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा एमएमआरडीएच्या बीकेसी येथील मैदानावर प्रस्तावित असल्याने सदर मेळाव्याकरिता येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था मुंबई विद्यापीठाच्या कलीना संकुलातील भूखंडावर करण्यात आली आहे.येथे पार्किंग व्यवस्था करण्याकरिता महापालिकेच्या एच/पूर्व विभागाचे अधिकारी/कर्मचारी व्यक्तिशः राबत आहेत. सदर ठिकाणी असलेली झाडे तोडून तेथील मातीसकट डंपरने इतरत्र हलविण्यात आली आहेत व त्याकरिता महापालिकेचे डंपर व जेसीबी वापरून पालिका नियमबाह्य कामकाज करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांनी केला.

या राजकीय मेळाव्याकरिता एमएमआरडीएचे आयुक्त बीकेसी येथील मैदानात स्वतःजातीने उपस्थित राहून मर्यादे बाहेर जावून खुर्च्या टाकण्याचे काम करीत असल्याची टीका करीत राजकीय पक्षाचे काम करण्यासाठी या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

एका राजकीय गटाच्या उथळ कार्यक्रमाकरिता पालिकेने नियमबाह्य कामकाज केल्याने एच/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त,मुंबई मनपा आयुक्त आणि एमएमआरडीएचे आयुक्त यांची जबाबदारी निश्चित करून त्यांना तात्काळ निलंबित करावे अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ‘घेराव आंदोलन’ पुकारण्यात येईल,असे पत्र राज्याचे मुख्य सचिव यांना इमेलव्दारे पाठवून मागणी केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Check Also

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *