Breaking News

संजय राऊत यांना मध्यरात्री अटक, तर दिवसा कोठडी ईडी न्यायालयाने घरच्या जेवणास आणि रात्री १०.३० नंतर चौकशी करण्यास मनाई

गोरेगांव येथील पत्रावाला चाळ प्रकरणात शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांची काल दिवसभर त्यांच्या घरी आणि संध्याकाळपासून मध्यरात्री पर्यंत ईडी कार्यालयात चौकशी केली. त्यानंतर संजय राऊत यांना मध्यरात्रीनंतर ईडीने अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांना ईडी न्यायालयात हजर करण्यात आले असता अखेर न्यायालयाने संजय राऊत यांनी ४ ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली.

सुनावणीदरम्यान, ईडीने संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी अशी मागणी केली होती. यानंतर न्यायालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. दरम्यान वैद्यकीय कारणास्तव रात्री १०.३० नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही अशी हमी यावेळी ईडीने न्यायालयात दिली.

विशेष सरकारी वकील हितेन यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला १ कोटी सहा लाखांचा फायदा झाल्याचं सांगितले. ईडीने यावेळी प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे फ्रंट मॅन असून आमच्याकडे किहीममधील जमीन विक्रेत्यांचे काही मालमत्तांबाबत जबाब असल्याची माहिती दिली. पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही यावेळी ईडीकडून कऱण्यात आला.

संजय राऊत यांच्या वतीने वकिलांनी आठ दिवसांची कोठडी देण्यास विरोध दर्शवला. राजकीय सुडापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला. ‘आर्थिक गुन्हे शाखेने २०२० मध्ये पत्रा चाळ प्रकरणाचा तपास सुरू केला. परंतु प्रवीण राऊत यांच्या विरोधात गेल्या वर्षी ईसीआयआर नोंदवण्यात आला आणि त्यांना यावर्षी जानेवारीमध्ये अटक करण्यात आली. असं असतानाही संजय राऊतांना आतापर्यंत अटक करण्यात आली नव्हती,’ ही बाब ईडीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

संजय राऊतांना रात्री १२.३० वाजता अटक करत स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आल्याचं यावेळी संजय राऊतांच्या वकिलांनी सांगितले. तसेच संजय राऊतांना ह्रदयाचा त्रास असल्याचे त्यांनी सांगितले. यावर ईडीने औषधं आणि घरचं जेवण देण्यास आपला विरोध नसल्याचं स्पष्ट केले.

संजय राऊतांची रात्रीच्या वेळी चौकशी केली जाऊ नये अशीही विनंतीही करण्यात आली. यावर ईडीने सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान संजय राऊत वकिलांशी सल्लासमलत करु शकतात असं सांगितलं. तसंच रात्री १०.३० नंतर त्यांची चौकशी न करण्याची हमी दिली. यानंतर न्यायालयाने निकाल वाचन करताना संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. संजय राऊतांना आठ दिवसांची कोठडी देण्याची गरज नसून चौकशीसाठी इतकी पुरेशी असल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *