Breaking News

१७ तारखेपर्यत सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात दिड वर्षाखाली नोंदविलेल्या गुन्ह्याखाली चौकशीसाठी ताब्यात घेतले

काही दिवसांपूर्वी आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानावर हल्लाबोल करत आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्ये १०९ जणांसह अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनाही अटक केली. सध्या सदावर्ते यांना गिरगांव न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असतानाच सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना तेथील एका गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

मराठा आरक्षणासंबधी एका खाजगी प्रसारमाध्यमाला मुलाखत देताना सदावर्ते यांनी मराठा समाजाविषयी आणि भाजपा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्याविषयी अनुद्गार काढले. याप्रकरणी अॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात साताऱ्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी पाचारणही केले. परंतु ते चौकशीला आले नाहीत. त्यामुळे आता सिल्व्हर ओकवरील हल्ल्यात त्यांना कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांचा ताबा घेण्यासाठी साताराचे पोलिस मुंबईत आले होते. तसेच त्यांनी गिरगांवच्या न्यायालयाकडे त्यांचा ताबा मागितला असता त्यांना १७ एप्रिलपर्यत ताबा दिला.

सदावर्ते यांच्या विरोधात मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दीड वर्षापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर सातारा पोलीसांनी ऑर्थर रोड तुरुंगातून सदावर्तेंना ताब्यात घेऊन साताराकडे रवाना झाले.

याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ऑर्थर रोड तुरुंगातून ताबा घेतला आहे. सध्या गुणरत्न सदावर्ते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत आहेत. या प्रकरणात त्यांना आधी चार दिवसांची पोलीस कोठडी आणि नंतर आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणी सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी वारंवार चौकशीला बोलावून ते गैरहजर राहिले. त्यामुळे सातार पोलिसांनी आता गिरगाव न्यायालयात सदावर्तेंच्या चौकशीसाठी ताब्याची मागणी केली होती.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *