Breaking News

बोरिवलीमध्ये उद्यापासून रंगणार गरबा क्विन प्रिती-पिंकीचा रंग रास गरबा

विधापरिषदेचे भाजपचे गट नेते, आमदार प्रविण दरेकर यांच्या रायगड प्रतिष्ठानच्यावतीने उद्या २६ सप्टेंबर २०२२ पासून नऊ दिवस रंग रास गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. गरबा क्विन पिंकी आणि प्रिती यांची गाणी असलेला भव्य गरबा मुंबईकरांसाठी मोफत असणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते उद्या सायंकाळी ६.३० वाजता रंग रास गरबाचा शुभारंभ होणार आहे.

“रंग रास” या भव्य गरबा उत्सवाचे आयोजन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान, चिकूवाडी, बोरिवली (पश्चिम) येथे करण्यात आले आहे. उद्याच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनिल राणे यांची विशेष उपस्थिती असेल. तर आमदार अतुल भातखळकर, आमदार योगेश सागर, आमदार भाई गिरकर, आमदार मनिषा चौधरी, भाजप जिल्हा संघटक गणेश खणकर, महिला जिल्हा संघटक योगिता पाटील, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमर शहा आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात सर्वच सणांवर प्रतिबंध असल्यामुळे कुठलेच सण साजरे होऊ शकले नाहीत. परंतु राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वच सणांवरील निर्बंध हटविण्यात आले. त्यामुळे यंदाच्या वर्षी सर्व सण अतिशह उत्साहात आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती आयोजक, आमदार प्रविण दरेकर यांनी दिली.

प्रिती-पिकिंचा हा गरबा सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आला आहे. गरब्याच्या ठिकणी सुरक्षितेतीची सर्व काळजी घेण्यात आली आहे. गरोदर महिला, लहान मुले, वयोवृध्द नागरिक यांच्यासाठी बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रायगड प्रतिष्ठानचे प्रकाश दरेकर, पिनाकिन शहा व शिवानंद शेट्टी यांनी या रंग रास गरब्याचे आयोजन केले आहे.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *