Breaking News

राज ठाकरेंनी दिला पिंपळे यांना धीर, लवकर बऱ्या व्हा, बाकी (फेरीवाल्यांचे) आम्ही पाहतो ज्युपिटर रूग्णालयात जावून पिंपळे यांची केली विचारपूस

ठाणे: प्रतिनिधी

अनधिकृत फेरिवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अमरजित यादव याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्या. सहाय्यक आयुक्त कल्पना पिंपले यांच्यावर येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रूग्णालयात जावून विचारपूस केली, यावेळी राज यांनी तुम्ही लवकर बऱ्या व्हा, बाकीचं (फेरीवाल्याचं) आम्ही पाहतो, असा धीर दिला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे, नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, ठाणे मनसे जिल्हाध्यक्षही यावेळी उपस्थित होते.

दोन दिवसांपूरवी ठाण्यात अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्त कल्पना पिंपले यांच्यावर अमरजित यादव या फेरीवाल्याकडून कासार वडवली भागात कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात स्वत:चा बचाव करताना पिंपळे यांच्या हाताची ने दोन बोटे छाटली गेली. तसेच त्यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. पिंपळे यांच्या सुरक्षा रक्षकानेही यादव यास रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावरही यादन याने हल्ला केला त्यात सुरक्षा रक्षकाचेही एक बोट कापले गेले.

जे काही घडलं त्याचं दुखः आहे. काळ मात्र सोकावतो आहे, एखाद्या महिला अधिकाऱ्यावर हल्ला केला जातो, अशा हल्लेखोराची हिंमत ठेचणे गरजेचे आहे. या हल्लेखोरावर पोलीस योग्य ती कारवाई करतीलच आणि न्यायालयसुध्दा त्यांचे कर्तव्य बजावेल अशी आशा आहे. हल्लेखोरास कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असे ही ते म्हणाले.

ठाणे येथे दोन अडीच वर्षापूर्वी मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन अनधिकृत फेरीवाले यांच्या विरोधात होते. या आंदोलनानंतर अधिकृत व अनधिकृत फेरिवाले असा फरक करण्यात आला होता. मनसेच्या या आंदोलनामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. या आंदोलनाचा फेरिवाल्यांनी धसका घेतला होता. तसेच पोलिस व ठाणे महानगरपालिकाही सावध झाली होती. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात मनसेचे आंदोलन झाल्यानंतर ठाणे रेल्वे स्टेशनचा परिसर अनेक महिने मोकळा झाला होता. मात्र आता पुन्हा स्टेशन परिसरात फेरिवाल्यांची गर्दी वाढत असल्याचे दिसते.

Check Also

केतकी चितळेला मिळाली न्यायालयीन कोठडी, मात्र दोन ठिकाणचे पोलिस घेणार ताबा सध्या गोरेगांव पोलिसांच्या ताब्यात नंतर पिंपरी चिंचवड आणि देहू रोड पोलिस घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी …

Leave a Reply

Your email address will not be published.