Breaking News

एनसीबी म्हणते, एसआयटी तपास करणार पण कोणाकडून केसेस काढल्या नाहीत ट्विट करत परिपत्रक जारी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

एनसीबीचे साऊथ वेस्ट झोनलचे डेप्युटी डिजी मुथा अशोक जैन यांनी आर्यन खान सह ६ केसेसचा तपास दिल्ली पथकाकडून करण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर प्रसार माध्यमांसाठी उलट सुलट चर्चांना उधाण आले. यापार्श्वभूमीवर एनसीबीने रात्री उशीराने एक परिपत्रक जारी करत त्या ६ हायप्रोफायल केसेसचा खोलात जावून तपास करण्यासाठी एसआयटीची अर्थात विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती देत मात्र या केससचा तपास करणाऱ्या एकाही अधिकाऱ्याला यातून बाजूला करण्यात आले नसल्याचा खुलासा एनसीबीने आपल्या परिपत्राद्वारे ट्विट करत केला.

आर्यन खान ड्गर्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या समीर वानखेडे यांच्यावर या प्रकरणातील एक पंच प्रभाकर सैल याने गौप्यस्फोट करत समीर वानखेडे यांना ८ कोटी रूपये देण्यात येणार होते असा गंभीर आरोप केला. त्यानंतर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरून आणि त्यांच्या मालदीव, दुबई दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एकामागोमाग एक खुलासे करत त्यांना संशयाच्या भोवऱ्यात उभे केले.

वानखेडे यांच्याबाबत ८ कोटी रूपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप झाल्यानंतर एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयातून एक पथक तपासणी करण्यासाठी आले. त्यावेळी या पथकाने पंच प्रभाकर सैल आणि दुसरा एक पंच के.पी.गोसावी यांना जबाब देण्यासाठी येण्याचे आवाहन केले. तसेच समीर वानखेडे यांचा जबाबही नोंदविला. मात्र हे दोन्ही पंच एनसीबी कार्यालयात पोहचू शकले नाहीत. त्यातील के.पी.गोसावी याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. तर प्रभाकर सैल यांनी एनसीबी कार्यालयात न जाणे पसंत केले.

यापार्श्वभूमीवर आर्यन खान प्रकरणी नव्याने येत असलेल्या माहितीमुळे हा प्रकरणाच्या कायदेशीर बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापार्श्वभूमीवर ६ हाय प्रोफाईल केसेसचा विशेष तपास पथकाच्या माध्यमातून तपास करण्याचा निर्णय घेतला असून हे पथक या सहा ही प्रकरणाची खोलात जावून चौकशी करणार असल्याचे एनसीबीने स्पष्ट केले.

तसेच या प्रकरणाचा पूर्वीपासून तपास करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला सध्या करत असलेल्या कामातून बाजूला करण्यात आले नसल्याचेही एनसीबीने स्पष्ट केले.

Check Also

हायजॅक केलेल्या जहाजाची अरबी समुद्रात भारतीय कमांडोंनी केली मुक्तता

डिसेंबर महिन्यात सोमालिया जवळ केलेल्या एका भारतीय मालवाहू पण माल्टा ध्वज लावलेले भारतीय मालकीच्या जहाजाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *