Breaking News

मलिकांचा सवाल, समीर वानखेडे यांच्या आईचे दोन वेगवेगळ्या जातीचे मृत्यू दाखले कसे ? समीर दाऊद वानखेडेने आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आधी मुस्लिम तर दुसर्‍या दिवशी हिंदू म्हणून दाखला घेतला - नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी
समीर दाऊद वानखेडे याने आईच्या मृत्यूनंतरही फर्जीवाडा केला असल्याचा आणखी एक गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
समीर दाऊद वानखेडे याने १६ एप्रिल २०१५ रोजी आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम महिला असे प्रमाणपत्र घेऊन ओशिवरा मुस्लिम कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार केले आणि लगेच दुसर्‍या दिवशी १७ एप्रिल २०१५ रोजी मुंबई मनपाकडून हिंदू नावाचा मृत्यू दाखला घेतला असा आरोप करत त्याचे पुरावेही यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमसमोर उघड केले. हा परिवार मुस्लिम असताना दुहेरी ओळख कशी दाखवत आहेत असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
फर्जीवाडा करुन अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकरी मिळवली आणि आता परिवार मुस्लिम असतानाही आईच्या मृत्यूचा दाखला मनपाकडून हिंदू म्हणून घेतला. दोन पध्दतीची ओळख वानखेडे कुटुंब कसे ठेवत आहे ? आम्ही जे दाखले ट्वीट करत आहे, ते दाखले मनपाकडून अधिकृत घेऊनच करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
६ ऑक्टोबरपासून समीर दाऊद वानखेडे याचे अनेक फर्जीवाडे उघड करण्याचे काम सुरू केले आहे. ५० दिवसात आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात कसे अपहरण करण्यात आले. २५ कोटीची डील १८ कोटीवर झाली हे उघड झाले आहे. जन्माच्या दाखल्यात, शाळेच्या दाखल्यात फेरफार केले. बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली. अल्पवयीन असताना समीर दाऊद वानखेडे याच्या वडिलांनी समीर वानखेडे याच्या नावाने परमिट रुमचे लायसन्स घेतले. आम्ही हे सर्व समोर आणल्याचे त्यांनी सांगितले.
एखादा व्यक्ती धर्म परिवर्तन करत असेल तर त्याचे गॅझेट करुन जाहीर करायचे असते. मात्र तसे करण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *