Breaking News
helmet
helmet

दुचाकीस्वारांनो; हेल्मेट वापरा नाहीतर लायसन्स रद्द मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा इशारा

दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसणाऱ्याने हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र अनेक दुचाकी स्वाराबरोबर मागे बसणाऱ्या व्यक्ती हेल्मेट घालत नसल्याचे मुंबई वाहतूक अर्थात ट्रॅफिक पोलिस दलाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे हेल्मेट न घालणाऱ्यावर कारवाईचा भाग त्यांचे ड्रायव्हिंग लायसेन्स रद्द कऱण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

यासंदर्भात मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी यासंदर्भात एक आदेश आवाहन वजा आदेश नुकताच जारी केला.
मुंबई हे गजबजलेले शहर आहे. तसेच रस्तेही रूंदीने मोठे असले तरी अनेकवेळा बेदरकार दुचाकी चालविल्याने दुचाकीस्वारांच्या अपघाताच्या घटना घडताना आढळून येतात. त्यासाठी राज्य सरकारने यासंदर्भात कायदा करत दुचाकी स्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक केले. मात्र अद्यापही अनेक दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नसल्याचे आढळून आले आहे.

याशिवाय दुचाकीस्वाराबरोबरच त्याच्यासोबत असलेला व्यक्तीही हेल्मेट वापरत नसल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे अपघातात दुचाकी स्वाराबरोबरच त्यांच्या सोबत असलेल्या किंवा मागे बसलेल्या व्यक्तीचा अपघाता दरम्यान शाररीक ईजा, प्राणहानी होण्याच्या दुर्दैवी घटना घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी यासंदर्भात एक आज आदेश वजा आवाहन करणारे पत्रक जारी केले आहे.

या पत्रकानुसार शहरातील सर्व दुचाकी स्वारांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या १५ दिवसांमध्ये दुचाकी स्वाराबरोबरच त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्य़ात आले आहे. त्यामुळे जर दुचाकीस्वाराबरोबर त्याच्या सोबतच्या व्यक्तीने हेल्मेट वापले नाही तर त्या दोघांवरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

याशिवाय दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले असेल अन् त्याच्या पाठिमागे बसलेल्या व्यक्तीने जर हेल्मेट घातले नसल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला. हेल्मेट न वापरणाऱ्यास मोटार वाहन कायद्यातील तरतूदींप्रमाणे ५०० रूपयांचा दंड आणि तीन महिन्यासाठी ड्रायव्हिंग लायसेन्स निलंबित करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

त्यामुळे दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे आता हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. जर हेल्मेट वापरले नाहीतर ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात येणार आहे.

Check Also

नवाब मलिक यांना अखेर न्यायालयाने दिली “या” गोष्टीसाठी परवानगी खाजगी रूग्णालयात उपचार करून घेण्यास परवानगी दिली

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबधित व्यक्तींशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी सध्या ईडीच्या तुरुंगात असलेले राज्य मंत्रिमंडळातील …

Leave a Reply

Your email address will not be published.