Breaking News

संपादक किशोर पाटील यांचा मानद डॉक्टरेट आणि जीवन गौरव पुरस्काराने सन्मान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार

मराठी ई-बातम्या टीम

महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ ओडिसा राज्य व निती आयोग पुरस्कृत कोरोनायोद्धा समाजसेवा रत्न गौरव पुरस्कार व मानद डॉक्टरेट पदवीने दै. स्वराज्य तोरणचे संपादक किशोर पाटील यांना नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. मागील २७ वर्षापासून पाटील हे पत्रकारीतेत सक्रिय असून कोविड काळात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेवून संस्थेने मानद डॉक्टरेट देवून सन्मानित केले. याशिवाय नागपूर येथे केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी- दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मिलिद दहीवले यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भिवंडी तालुक्यातील कैलास नगर बेलपाडा या छोट्याशा गावातून किशोर पाटील यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. सुरुवातीला इतर दैनिकांमधून आपला उमेदवारीचा काळ व्यतीत केल्यानंतर मागील १३ वर्षापासून स्वराज्य तोरण हे वर्तमान पत्र सुरु केले. तसेच त्याचे संपादक म्हणून काम पहात आहेत.

पत्रकारीतेबरोबरच किशोर पाटील हे महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्यस्तरीय सदस्य आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस आहेत. त्यानी आपल्या लेखणीतून सामाजिक बांधीलकी जपत सर्व समाज बधावांच्या अनेक समस्यांना पत्रकारीतेच्या माध्यमातून वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

गेली दोन वर्ष पत्रकारांना कोव्हिड् १९ काळात मोलाचे सहकार्य करून ते खंबीरपणे पत्रकारांच्या पाठीशी उभे राहिले व पत्रकारांना मदतीचा हात पुढे केला. याची दखल

घेऊन महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ भुवनेश्वर ओडिसा राज्य यांनी पत्रकार क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पुरस्कारने सन्मानित केले.

किशोर पाटील यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सहकार महर्षी तथा शिवसेना तालुका विश्वास थळे ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे, शांताराम मोरे, महेश चौघुले, माजी आमदार रूपेश दादा म्हात्रे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *