Breaking News

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दाऊदच्या नावाने धमकी, १०० कोटी द्या, अन्यथा.. नागपूर पोलिस आणि सायबर सेलकडून वेगाने तपास सुरु

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी तीन वेळा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने फोन करत १०० कोटी रूपये द्या अन्यथा घरी आणि जनसंपर्क कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी फोनवरून देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली.

नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी साडेअकरा ते साडेबारा वाजतादरम्यान सलग तीन धमकीचे फोन आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामल्यातील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी ११.२८ मिनिटांनी एक फोन आला. जितेंद्र शर्मा याने तो फोन उचलला. समोरच्याने थेट दाऊद इब्राहिमचे नाव घेऊन गडकरींनी १०० कोटी रुपयांची खंडणी द्यावी अन्यथा आम्ही भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात आणि नितीन गडकरी यांच्या घरी बॉम्बस्फोट करू’ अशी धमकी दिली. खंडणीसाठी फोन आल्यामुळे जितेंद्र शर्मा यांनी गडकरींचे कुटुंबिय आणि खासगी सहायकांना फोन करून माहिती दिली. तसेच भाजपाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही माहिती दिली. त्यानंतर १० मिनिटांतच म्हणजे ११.३८ मिनिटांनी दुसरा फोन आला.

१०० कोटींच्या खंडणी मागणी करीत पैसे न दिल्यास बॉम्बस्फोट करण्याची पुन्हा धमकी देण्यात आली. त्यानंतर खळबळ उडाली. गडकरी यांच्यापर्यंत ही बातमी गेली. पोलिस, एटीएस पथकांना लगेच माहिती देण्यात आली. यादरम्यान १२.३० मिनीटांनी पुन्हा फोन आला आणि पुन्हा धमकी देण्यात आली.

त्यामुळे पोलिसांनी लगेच गडकरी यांच्या घरी सुरक्षा व संपर्क कार्यालयात सुरक्षा व्यवस्था वाढवली. धमकीचे फोन येताच पोलीस उपायुक्त मदने, अनुराग जैन आणि गुन्हे शाखेचे मुमक्का सुदर्शन यांनी गडकरींच्या कार्यालयाला भेटी देऊन सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. आज सायंकाळी नितीन गडकरी यांचे कार्यक्रम आहेत. त्यामुळे पोलिसांनी गांभीर्य दाखवून कार्यक्रमस्थळीसुद्धा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांचे खामल्यात जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात आज (शनिवार) सकाळी साडेअकरा वाजता फोन आला. फोनवरून बोलणा-या व्यक्तीने दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगून नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि काही सेकंदातच त्याने फोन कट केला. फोन घेणाऱ्याने लगचे भारतीय जनता पक्षातील वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. अर्ध्यातासातच गडकरी यांच्या संपर्क कार्यालयास पोलिसांनी वेढा घातला. तसेच दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलवाद विरोधी अभियानाचे पथकासह अन्य यंत्रणा सतर्क झाली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गडकरी यांचे वर्धा रोडवरील घर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयासमोर मोठा ताफा तैनात केला आहे. शस्त्रधारी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली असून घराकडे आणि जनसंपर्क कार्यालयाकडे जाणारे रस्ते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे. नागपूर पोलिसांची बॉम्ब शोधक-नाशक पथक आणि श्वानपथकहा सज्ज ठेवण्यात आले आहे.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *