पुणे शहर मुंबईनंतरच सर्वाधिक वर्दळीचं आणि लोकसंख्येच शहर याच शहरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या निमित्ताने येणारी लोकं-तरूण पिढी सातत्याने स्थलांतरीत होत आहे. मात्र याच पुण्यात सातत्याने मुलींवर खुनाचे हल्ले तर कधी नशेली ड्रग्जच्या सेवनाच्या विळख्यात अडकत चाललेली तरूण पिढी, आणि राज्याचं प्रशासन खुशाल आपल्या प्रशासकिय आब राखण्याच्या नादात कायदा व सुव्यवस्थेची बाहेर लटकणारी लक्तरे रोखण्यास आता कोणी राहिल्याचे दिसून येत आहे.
या सगळ्या घडामोडीत आज दुपारपासून समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा हातात धारदार शस्त्र हाती धरून बस डेपोत नागरिकांसमोर फिरत आहे. तर एका बाजूला एक मुलगी खाली बसलेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही घटना घडताना बस डेपोत मोठ्या प्रमाणात बघ्याची गर्दी त्या कोयत्या धारी मुलाच्या आणि गंभीर जखमी किंवा मृत पावलेल्या मुलीच्या चोहोबाजूंनी सर्वजण बघत उभारल्याचे दिसून येत आहे.
पण ज्याच्या हाती धारदार शस्त्र धरलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या हालचालीतून कोणत्याही प्रकारची विषण्णता दिसून येत नाही. तो खुले आम हाती कोयता घेवून फिरत आहे, तसेच फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे त्या व्हिडिओतून दिसून येत आहे.
#पुणे
एवढ्या लोकांमध्ये शुभदा शंकर पोतेरे (वय २८) हिचा कृष्णा कनोजा (वय ३०) याने कोयत्याने वार करून खून केला. याला रोखण्याची एकाचीही हिंमत झाली नाही.
लोक कोयत्याला घाबरतात
पण तरीही तिला वाचवता आले असते.#pune#punenews pic.twitter.com/NNLJr5pgyk— Brijmohan Patil (@brizpatil) January 9, 2025
त्यानंतर दुसरा एक व्यक्ती दोन्ही हातात वीटा घेऊन येतो, त्यानंतर ज्याच्या हाती कोयता, धारदार शस्त्र हाती धरलेला तो मुलगा कोयता लांब फेकून देतो. त्यानंतर त्यावेळी चोहोबाजूंनी उभे असलेले गर्दीतील लोक त्या मुलाला मारहाण करतात.
दरम्यान हा व्हिडीओ बस डेपोला लागून असलेल्या एका उंच इमारतीच्या टेरेसवरून अज्ञात व्यक्तीने शुट केल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओतून घडलेला घटनाक्रम तर दिसून येतो.
या घटनेतील मुलगी २८ वर्षीय शुभदा शंकर पातेरे असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ज्याने कोयता हाती घेऊन मुलीवर हल्ला केला त्याचे नाव कृष्णा कनोजा असल्याचे सांगण्यात येत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात अर्थात निवडणूकीपूर्वी पुण्यातच एका व्यक्तीकडून एका मुलीवर हल्ला करत तीचा हल्लोखोराला धाडसीपणाने पकडून रोखले. त्यानंतर नागरिकांनी सदर व्यक्तीला पोलिसांच्या हवाली केले होते. त्या घटनेस फार फार तर सहा महिने झाले नाहीत तोच पुण्यातच अशी घटना घडल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्र आता थांबणार नाही तो बदलणार अशी घोषणा दिली होती. ती घोषणा याच अनुषंगाने अपेक्षित होती का असा प्रश्न निर्माण होत आहे.