Breaking News

मुख्यमंत्र्यांची ग्वाही, खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडीतेला न्याय देणार गृहमंत्री, मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा

मुंबई : प्रतिनिधी

साकिनाका परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून निर्भया महिलेचा खटला जलदगती अर्थात फास्टट्रक कोर्टात चालविण्याचा आदेश पोलिसांना दिले. तसेच याप्रश्नी मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत म्हणाले की, साकिनाका येथील घटना माणूसकीला काळीमा फासणारे कृत्य आहे. पीडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्टट्रक कोर्टात चालवून कठोरात कठोर शिक्षा केली जाईल अशी ग्वाही देत तपासाला गती देण्याचे आदेश दिले.

साकिनाका येथे रात्रीच्यावेळी टेम्पोत एका व्यक्तीने महिलेवर बलात्कार करून सदर महिलेच्या गुप्तांगात रॉड घुसविला. त्यामुळे सदर महिला जखमी होवून बेशुध्दावस्थेत राहीली. या दरम्यान सदर महिलेला मारहाण होत असल्याचा आवाज येथील एका कारखान्याच्या वॉचमनने ऐकला आणि तातडीने पोलिस वायरलेसवर फोन केला. वायरलेसवरून संबधित पोलिस स्टेशनला कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सदर महिलेला तात्काळ घाटकोपर येथील राजवाडे हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर रात्रीपासून उपचार करण्यात येत होते. परंतु अखेर त्या महिलेची मृत्यूबरोबर असलेली झुंज आज सकाळच्या सुमारास संपुष्टात आली.

सदरची महिला बेशुध्दावस्थेत असल्याने त्या महिलेचा जबाब घेता आला नसल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी देत पुढे म्हणाले की, महिलेचा मृत्यू झाल्याने त्यावेळी काय घडले याची कोणतीच माहिती आम्हाला मिळू शकली नाही. मात्र आम्ही तपास करून याप्रकरणातील आरोपीच्या विरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल करणार असल्याचे सांगितले.

सदरची घटना साकिनाका येथील खैरानी रोडवर घडली असून सदरची महिला ३२ वर्षिय असल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

केतकी चितळेला मिळाली न्यायालयीन कोठडी, मात्र दोन ठिकाणचे पोलिस घेणार ताबा सध्या गोरेगांव पोलिसांच्या ताब्यात नंतर पिंपरी चिंचवड आणि देहू रोड पोलिस घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी …

Leave a Reply

Your email address will not be published.