Breaking News

मुंबईत १५ मे पासून जी २० देशांच्या बैठका बैठकीच्या पूर्वतयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा

जी – २० अंतर्गत तिसऱ्या एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे नियोजन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने करावे, अशा सूचना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आज येथे दिल्या.

मुंबई येथे १५ ते १७ मे दरम्यान तिसऱ्या एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांसाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी बैठक घेतली. बैठकीत नवी दिल्लीतून केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी घेतला.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ऊर्जा विभाग प्रधान सचिव आभा शुक्ला, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त वेलारासू, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, उद्योग विकास आयुक्त माणिक गुरसळ, माहिती संचालक हेमराज बागूल, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते.

मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी सांगितले की, बैठकीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी संबंधित विभागांनी समन्वय अधिकारी नियुक्त करावे. त्यांना आवश्यक प्रशिक्षण द्या. केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी राज्य शासनाच्या वतीने अपेक्षित सहकार्य याबाबत माहिती दिली. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत संबंधित विभागांनी कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिल्या.
बैठकीस उद्योग विभागाचे सह संचालक सुरेश लोंढे, मुंबई महापालिका उपायुक्त मनीष वळंजू, विनायक विसपुते आदी उपस्थित होते.

Check Also

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदी यांचा केवळ मुखवटा…

नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतासाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरिब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *