Breaking News

महायुतीच्या शपथविधीसाठी या सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना निमंत्रण अमित शाह, जे पी नड्डा आधीपासूनच आझाद मैदानावर उपस्थित

संशयित बहुमताच्या आधारे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर आज सत्ता स्थापनेसाठी शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सत्ता स्थापनेच्या शपथविधी सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, आदी उपस्थित होते.

याशिवाय केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह भाजपाशासित राज्याचे अन्य मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित होते.

भाजपा मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी बॉलीवूड अभिनेते शाहरूख खान, संजय दत्त, सलमान खान, रणवीर सिंह, अभिनेत्री माधुरी दिक्षित-नेने या त्यांच्या पतीबरोबर आल्या होत्या. याशिवाय भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, आदी सेलिब्रिटी उपस्थित होते.

उद्योग जगतातील रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी हे ही उपस्थित होते. त्याशिवाय टाटा ग्रुपचे प्रतिनिधी, गोदरेज कंपनीचे प्रतिनिधींसह विविध देशांच्या राजदूतांनाही यावेळी निमंत्रित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *