मुंबई

तुकाराम मुंढे, अश्विनी भिडे यांच्यासह १० आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या

१ एप्रिलपासून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. मात्र तत्पूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने राज्यातील १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर आयएएस अधिकाऱ्यांमधील काही जण सेवा निवृत्त झाल्याने त्यांच्या ठिकाणी इतर आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये दिव्यांग विभागाचे …

Read More »

मुंबई महापालिकेच्या आय़ुक्त पदाची जबाबदारी आता अश्विनी भिडे यांच्याकडे आयएएस अधिकारी भूषण गगराणी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागे अश्विनी भिडे यांची नियुक्ती

संपूर्ण देशभरात पुरुषांच्या बरोबरीने महिलांची संख्या वाढत आहे. तसेच प्रत्येक कार्पोरेट, सेवा क्षेत्र, यासह सर्व सरकारी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. तरीही राजकारणात आणि नोकरी क्षेत्रात महिलांचा सहभाग आणखी वाढविण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच देशात महिला आरक्षण विधेयक पारित केले. त्याची अंमलबजावणी २०२७ पासून होणार असली तरी त्याची अप्रत्यक्ष अंमलबजावणी विद्यमान …

Read More »

एकनाथ शिंदे यांची घोषणा, मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ आता नव्याने झोपड्या निर्माण होऊ नये म्हणून “नेत्रम” ठेवणार लक्ष

मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. एकीकडे झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देत दुसरीकडे नेत्रम तंत्रज्ञानाच्या मदतीने नव्या झोपड्या उभारल्या जाऊ नये याची पण काळजी घेतली जाणार आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे महत्वाचे अभियान राबवून एकप्रकारे बाळासाहेबांना ही …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावीकरांच्या हक्कासाठी सरकारने हस्तक्षेप करावा स्थानिकांना बेघर व इतर जागी स्थलांतर करण्याची भिती, हा धारावीचा विकास आहे का अदानीचा?

धारावी पुर्नवसन प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांना बेघर करुन अदानीचे टॉवर उभे करण्यासाठी सरकारच्या मदतीने काम सुरु आहे.धारावीकरांना धारावीत घरे देणार असे सरकार सांगत असले तरी त्यांच्या करनी व कथनीत मोठी तफावत आहे. धारावीच्या काही भागांसाठीची Annexure – 2 यादी आता प्रसिद्ध करण्यात आली असून, यामध्ये ९६% रहिवाशांना ‘अनियमित’ किंवा ‘अपात्र’ ठरवण्यात आले आहे. धारावी पुनर्विकास योजनेच्या सर्वेक्षणात मोठा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईतील कुर्ला ते ट्रॉम्बे रेल्वे मार्गावरील झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करा लोकसभेत उपस्थित केला प्रश्न

मुंबईतील कुर्ला ते ट्रॉम्बे रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या कामामुळे हजारो कुटुंबांना नोटिसा देण्यात आल्या असून त्यांच्या घरांवर तोडफोडीचे संकट निर्माण झाले आहे.  स्थानिकांमध्ये भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. ही फक्त झोपडपट्टी नाही, तर हजारो कुटुंबांचे संसार आणि त्यांच्या मुलांचे भविष्य आहे. या लोकांनी कष्टाने उभारलेल्या घरांचे संरक्षण व्हावे व  त्यांचे योग्य …

Read More »

कल्याणमध्ये मेगा ब्लॉकच्या दिवशी अज्ञात व्यक्तीची करामतः रेल्वे खांबावर चढल्याने करंट प्रकृती गंभीर, ऐन उन्हाच्या तडाख्यात अज्ञात इसमाचे कृत्य

कल्याण रेल्वे स्थानकात एका अज्ञात व्यक्तीने दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या विद्युत खांबावर चढून गोंधळ घातल्याची घटना घडली. सुरुवातीला आरपीएफ जवानांनी त्याला समजावून खाली उतरण्याचे आवाहन केले. मात्र, त्याने ऐकले नाही आणि एका पुलावरून दुसऱ्या पुलावर चालत गेला. परिस्थिती गंभीर होत असल्याने कल्याणच्या रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन …

Read More »

सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार महसूल विभागाचा निर्णय, वर्षपूर्तीच्या तोंडावर खरेदी दारांची घाई

आर्थिक वर्ष संपत येत असल्याने, तसेच नवीन वर्षानिमित्त मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना वेग येण्याची शक्यता आणि महसूल वसुलीच्या इष्टांकाची पूर्तता करण्यासाठी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतला आहे. महाराष्ट्राचे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या चार …

Read More »

मुंबईत दुचाकी वाहनांसाठी ‘MH01FH’ नवीन नोंदणी मालिकेची सुरुवात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून माहिती जाहिर

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी केली जाते. सध्या दुचाकी खासगी परिवहनेत्तर (2W NT) वाहनांसाठी वापरात असलेली ‘MH01FG’ ही नोंदणी मालिका पूर्ण झाल्याने आता ‘MH01FH’ ही नवीन मालिका सुरू करण्यात येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी निखील साळुंखे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील सुधारित नियम …

Read More »

महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासात समृद्धीची पहाट घडवण्याचा एकनाथ शिंदे यांचा संकल्प ठाण्यातील पारंपरिक नववर्ष स्वागत शोभायात्रेत उपमुख्यमंत्र्यांसह शहरातील प्रमुख नेत्यांचा उत्स्फूर्त सहभाग

“महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर आनंदाची, प्रगतीची आणि विकासाची गुढी अभिमानाने उभारली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता-भगिनी यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण करून त्यांना यशाच्या उंच शिखरावर नेणे, हा आमचा संकल्प आहे. सामान्य माणसाच्या स्वप्नांना बळ देत त्याच्या आयुष्यात स्थैर्य, समृद्धी आणि आत्मविश्वासाची नवी पहाट उगवावी, …

Read More »

उदय सामंत यांची माहिती, बीएमसी क्षेत्रात एक लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांची विकास कामे सुरू शासनाकडील देय रक्कम महापालिकेस टप्प्याटप्प्याने देणार

मुंबईच्या विकासासाठी आणि नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा देण्यासाठी शासन आणि महानगरपालिका यांच्यात समन्वयाने काम सुरू आहे. मुंबई महापालिकेत सुमारे एक लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची विकास कामे सुरू असून मुंबई महापालिकेस शासनाकडून देय असलेली देय रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाईल, असे  उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत …

Read More »