Breaking News

रायगड जिल्हाधिकारी चौधरी यांच्यासह ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कल्याणकर रायगडचे जिल्हाधिकारी तर वारभुवन आदिवासी विभागात

मुंबई: प्रतिनिधी

राज्य सरकारने आज पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत. ज्या आयएएस अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून यामध्ये पाच जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोकणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत चांगले काम करूनही रायगडच्या जिल्हाधिकारी यांचीही बदली करण्यात आली असून त्यांना आयटी विभागाच्या संचालक पदावर नियुक्त करण्यात आले आहे. एक महिला अधिकारी म्हणून काम करत असतानाही रायगडमधील आपत्ती काळजीपूर्वक हाताळण्याऱ्या चौधरी यांची बदली करण्यात आल्याने त्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून की त्यांचे अवमुल्यन केले हे मात्र सामान्य प्रशासन विभागातून समजू शकले नाही.

डॉ.महेंद्र कल्याणकर यांची नियुक्ती रायगडच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

एम.बी.वारभुवन यांची सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव पदावरून आदीवासी विभागाच्या ठाणे येथे अतिरिक्त आयुक्त पदावर करण्यात आली आहे.

संजय मीना यांची ठाणे येथील आदीवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निधी चौधरी यांची रायगडच्या जिल्हाधिकारी पदावरून आयटी विभागाच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली.

तर दिपक सिंगला यांची गडचिरोली जिल्हाधिकारी पदावरून नागपूर येथे विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Check Also

मंत्रालय मधील कर्मचाऱ्यांना, सहायक कक्ष अधिकारी होण्याची संधी मर्यादित विभागीय परीक्षा पात्रतेची अधिसूचना जारी

मंत्रालय मधील विभागातील सहायक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी सहायक कक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published.